घरदेश-विदेशलडाखचे पहिले मराठमोळे सतिश खंदारे पोलीस महासंचालक

लडाखचे पहिले मराठमोळे सतिश खंदारे पोलीस महासंचालक

Subscribe

गुरुवारपासून अस्तित्वात आलेल्या लडाखच्या पोलीस प्रमुखपदी मराठमोळ्या सतीश खंदारे यांची नियुक्ती

केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीर आणि लडाखचे अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली आहे. हे दोन्ही प्रदेशांना ३१ ऑक्टोबरपासून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानंतर लडाखच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्राकडे देण्यात आली असून गुरुवारपासून अस्तित्वात आलेल्या लडाखच्या पोलीस प्रमुखपदी मराठमोळ्या सतीश खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सतीश खंदारे हे अमरावतीच्या धामणगावचे सूपुत्र लडाखचे पहिले पोलीस प्रमुख ठरणार आहे.

१९९५ मध्ये खंडारे आयपीएस अधिकारी

खंडारे यांचे प्राथमिक शिक्षण अमरावतीमधील धामणगाव तालुक्यातील जळका पटाचे येथील अशोक विद्यालयात झाले. दहावीची परिक्षा त्यांनी १९८६ मध्ये ८६ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण केली. त्यानंतर धामणगावांतील सेफला हायस्कूलमधून बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे येथील सीओयुपी अभियांत्रिकी महाविद्यालयातून ते १९९२ मध्ये बीई झाले. त्यानंतर १९९५ मध्ये ते आयपीएस बनले.

- Advertisement -

वेगवेगळ्या जिल्ह्यत जिल्हा पोलीस अधीक्षपद

सतिश खंदारे हे जम्मू काश्मीर कॅडरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी श्रीनगर परिसरात वेगवेगळ्या जिल्ह्यत जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदाचा कार्यभार सांभाळला.

  • २००५ मध्ये हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक
  • २००७ मध्ये पुणे येथे पोलीस उपमहानिरीक्षक
  • सीआरपीएफ नागपूर येथे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक
  • खारघर येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल विभागात पोलीस उप महानिरीक्षक
  • जम्मू काश्मीरमध्ये दाखल होऊन दोन वर्षे पोलीस महानिरीक्षक म्हणून खंदारे यांनी कार्यभार सांभाळला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -