‘मैं खाकी हूं’ या कवितेमुळे चर्चेत आलेल्या सिमाला नेमक्या कोण आहेत?

सिमाला यांनी बॉलिवूडच्या अलिफ या चित्रपटात काम केलं आहे.

लॉकडाऊनमध्ये IPS ऑफिसर सिमाला प्रसाद यांची ‘मैं खाकी हूं’ ही कविता खूप व्हायरल होत आहे. सिमला प्रसाद भारताच्या पोलिस दलात आहेत. आणि एक दबंग ऑफिसर म्हणून त्यांची ओळख आहे. सध्या त्या आयपीएस असोसिएशनच्या सचिव आहेत. त्यांनी बॉलिवूडच्या चित्रपटातही काम केलं आहे. याशिवाय सिमाला प्रसाद डिंडौरी जिल्ह्यात एसपी म्हणूनही काम केलं आहे.

२०१० च्या बॅचच्या त्या आयपीएश आधिकारी आहेत. केवळ त्यांच नाव ऐकूनच गुन्हेगांमध्ये कापरं भरतात. मध्यप्रदेशच्या डिंडोरी या नक्षसवादी भागात त्यांनी एसपी म्हणून दहशत निर्माण केली होती. त्यांचे वडिल डॉ. भागीरथ प्रसाद माजी आयपीएस अधिकारी होते. तर त्यांच्या आई मेहरून्निसा परवेज या प्रसिद्ध साहित्यकार आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सिमाला यांनी आयपीएस बवण्यासाठी कोणत्याच कोचिंग क्लास लावला नव्हता. स्वत: अभ्यास करून त्यांनी हे पद जिंकलं आहे. त्यांनी भोपाळच्या बरकतउल्ला युनिर्व्हसिटीमध्ये सोशियोलॉजी या विषयात गोल्ड मेडल मिळवले आहे.

सिमाला यांनी बॉलिवूडच्या अलिफ या चित्रपटात काम केलं आहे. त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले होते की, दिग्दर्शक जैगाम यांची ओळख झाली होती. ते आपल्या चित्रपटासाठी एका पात्राच्या शोधात होते. मग त्यांनी मला ही संधी दिली. हा चित्रपट समाजाला एक चांगलं मार्गदर्शन करणारा ठरला.


हे ही वाचा – Video – आणि म्हणून व्हायरल होतोय ऐश्वर्याचा ‘तो’ जूना व्हीडिओ!