घरताज्या घडामोडीSurgical Strike : इराणचे पाकिस्तानात ‘सर्जिकल स्ट्राईक’; आपल्या सैनिकांची केली सुटका 

Surgical Strike : इराणचे पाकिस्तानात ‘सर्जिकल स्ट्राईक’; आपल्या सैनिकांची केली सुटका 

Subscribe

जैश उल-अदल या दहशतवादी संघटनेने अडीच वर्षांपूर्वी इराणच्या सैनिकांचे सीमेहून अपहरण करुन त्यांना बंधक बनवले होते.  

इराणने या आठवड्यात पाकिस्तानात ‘सर्जिकल स्ट्राईक’ करुन कैदेत असलेल्या आपल्या सैनिकांची सुटका केल्याची माहिती आहे. इराणच्या एलिट रिव्होल्युशनरी गार्डसने (आयआरजीसी) पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक करून आपल्या दोन सैनिकांची सुटका केली. जैश उल-अदल (Jaish ul-Adl) या दहशतवादी संघटनेने अडीच वर्षांपूर्वी इराणच्या दोन सैनिकांचे सीमेहून अपहरण करुन त्यांना बंधक बनवले होते. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसनी गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ऑपरेशन करुन त्यांची सुटका केली. तसेच आयआरजीसीने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही सैनिकांना पुन्हा इराणमध्ये यशस्वीरीत्या पाठवण्यात आले.

जैश उल-अदल नामक पाकिस्तानातील वाहाबी दहशतवादी संघटनेने १६ ऑक्टोबर २०१८ रोजी इराण-पाकिस्तान सीमेवरुन १२ एलिट रिव्होल्युशनरी गार्डसच्या सैनिकांचे अपहरण केले होते. या सैनिकांच्या सुटकेसाठी इराण आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी समिती बनवण्यात आली होती. अपहरण झालेल्या १२ पैकी पाच जणांची १५ नोव्हेंबर २०१८ रोजी सुटका करण्यात आली होती. त्यानंतर २१ मार्च २०१९ रोजी पाकिस्तानी लष्कराने चार इराणी सैनिकांची सुटका केली.

- Advertisement -

इराणने जैश उल-अदलला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. इराणमध्ये राहणाऱ्या बलोच सुन्नींच्या अधिकारांच्या रक्षणासाठी जैश उल-अदलच्या इराण सरकारविरोधात कारवाया सुरु असतात. जैश उल-अदलनेच फेब्रुवारी २०१९ मध्ये इराणच्या बसीज या निमलष्करी तळावर हल्ला केला होता.


हेही वाचा – FIR दाखल झाल्यानंतर ग्रेटा थनबर्गचं दिल्ली पोलिसांना उत्तर!

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -