घरताज्या घडामोडीइराणमध्ये १८० प्रवाशांसह विमान कोसळलं, सर्व प्रवासी ठार

इराणमध्ये १८० प्रवाशांसह विमान कोसळलं, सर्व प्रवासी ठार

Subscribe

एकीकडे इराणनं अमेरिकेसोबत खुलं युद्ध छेडलं असतानाच, दुसरीकडे इराणमध्ये तब्बल १८० प्रवाशांना घेऊन उड्डाण घेतलेलं एक प्रवासी विमान उड्डाणानंतर अवध्या काही मिनिटांमध्येच कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. इरामधल्या सरकारी वृत्तवाहिनीने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. इराणच्या तेहरानमधल्या इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानानं युक्रेनला जाण्यासाठी उड्डाण घेतलं होतं. बोईंग ७३७ प्रकारातलं हे विमान युक्रेनची राजधानी किएव्हच्या दिशेनं निघालं होतं. मात्र, उड्डाणानंतर काही मिनिटांतच ते तेहरानच्या परांड भागात कोसळलं. या विमानात असलेले सर्वच्या सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडल्याचं आता स्पष्ट झालं असून ही मोठी दुर्दैवी घटना मानली जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, इराणने अमेरिकेसोबत सुरू केलेल्या सामरिक वादामुळे अनेक प्रवासी विमानांना देखील धोका निर्माण झाला आहे. लष्करी विमानं समजून प्रवासी विमानं देखील पाडली जाण्याची शक्यता लष्करी तज्ज्ञ वर्तवत आहेत. मात्र, या विमानाच्या अपघातामध्ये कोणतीही कारवाई झाली नसल्याचं सांगितलं जात आहे. तांत्रिक बिघाडामुळेच विमान कोसळ्याचा प्राथमिक अंदाज आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आता युद्ध होणार? अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणनं डागली क्षेपणास्त्र!

दरम्यान, इराणमध्ये या दुर्घटनेनंतर लगेचच दोन भूकंपांची देखील घटना समोर आली आहे. हे दोन्ही भूकंप अनुक्रमे ५.५ आणि ४.९ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे नोंदवले गेले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -