घरदेश-विदेशआमच्यावर हल्ला केलाततर याद राखा

आमच्यावर हल्ला केलाततर याद राखा

Subscribe

इस्रायलचा इराणला इशारा

इराण आणि अमेरिका यांच्यातील राजकीय तणावाचे परिणाम इतर देशांनाही भोगावे लागू शकतात. त्यातच आता इस्त्रायलनेही उडी घेतली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर सख्खे शेजारी पैके वैरी असलेले इराण आणि इस्रायल समोरासमोर उभे ठाकले आहेत. आमच्यावर हल्ला केलात तर याद राखा, असा सज्जड दम इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी इराणला दिला आहे. इराकमधील अमेरिकेच्या सैन्य तळांवर इराणने क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यावर नेत्यानाहू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. इस्रायलची राजधानी जेरुसलेम येथे एका परिषदेत बोलताना नेत्यानाहू म्हणाले, जर कोणी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -