घरट्रेंडिंगभयानक! इराणी तरुणीला सिगरेटचे चटके, आरोपी अटकेत

भयानक! इराणी तरुणीला सिगरेटचे चटके, आरोपी अटकेत

Subscribe

हे अमानुष कृत्य करणाऱ्या नराधमाचं नाव धनराज मोरारजी असून, तो पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अरविंद मोरारजी यांचा मुलगा आहे.

परवीन घेलिची ही ३० वर्षीय इराणची तरूणी पुण्यामध्ये सॉफ्टवेअरचं शिक्षण घेण्यासाठी आली होती. चांगलं शिक्षण आणि चांगली नोकरी हे स्वप्न उराशी बागळून परवीन इराणवरुन थेट पुण्याला आली. सॉफ्टवेअरचं शिक्षण घेत असताना तिची ओळख पुण्यातील धनराज मोरारजीशी या तरूणाशी झाली. धनराज हा पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अरविंद मोरारजी यांचा मुलगा आहे. धनराज आणि परवीन यांची मैत्री दिवसागणीक अधिक दृढ होत गेली आणि पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. सुरुवातीला परवीन धनराजसोबत खूप खूष होती. मात्र, भविष्यात हेच प्रेमसंबंध इतके भयानक रुप घेतील याची तिला जराही कल्पनाही नव्हती. कालांतराने धनराजची वागणूक बदलत गेली आणि पुढे जाऊन या वागणुकीने विभत्स रुप धारण केले. धनराजने परवीनला तब्बल २ महिने स्वत:च्या घरात डांबून ठेवले होते. या काळात त्याने तिला बेदम मारहाण केली, तिचा अमानुष छळ केला, तिला वारंवार सिगारेटचे चटकेही दिले. धनराजच्या या भयानक छळामुळे परवीनला जीव नकोसा झाला होता.

दोन महिने मुकाट अत्याचार सहन केल्यानंतर एक दिवस परवीनने धाडस दाखवले. तिने कसाबसा आपला मोबईल मिळवला आणि इन्स्टाग्रामवरुन तिच्या मैत्रिणीला मेसेज पाठवच तिच्याकडे सुटकेची मागणी केली. अखेर सोमवारी परवीनची मैत्रिण तिने पाठवलेल्या पत्त्यावर पोहचली आणि पोलिसांच्या मदतीने परवीनची सुखरुप सुटका केली.

- Advertisement -

वाचा: बलिदानाचा बदला घेणार; भारताची पाकिस्तानला तंबी

सविस्तर प्रकरण थोडक्यात…

नोव्हेंबर २०१८ मध्ये परवीनच्या एका मैत्रिणीने तिची धनराज मोरारजी याच्याशी ओळख करुन दिली. दोघांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्यावर धनराजने परवीनला ‘मी तुझी चांगली काळजी घेईन, तुझा आर्थिक खर्चही करेन’, अशी ग्वाही दिली. परवीनला धनराज आवडत असल्यामुळे त्याला होकार देऊन ती त्याच्या घरी राहायला गेली. दोन महिन्यांतर त्यांच्यातले संबंध बिघडू लागले, वाद सुरु झाले आणि नात्यात फूट पडू लागली. धनराजने परवीनचा फोन काढून घेत, तिचा जगाशी संपर्क तोडून टाकला. परवीनने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये धनराजने तिच्यावर केलेल्या छळाचा सविस्तर खुलासा केला. पोलिसांना माहिती देताना परवीन म्हणाली की, धनराजने एकदा माझ्या गळ्याला चाकू लावून ठार मारण्याची धमकी दिली होती. धनराज मला कोणाशीही बोलू देत नव्हता, माझ्या मोबाईलवरील कॉल आणि मेसेजकडे त्याचे लक्ष असायचे, मी माझ्या आईशी काय बोलायचे हे देखील तो वाचायचा. यासाठी तो गुगल ट्रान्सलेटरचा वापर करायचा.

इन्स्टाग्रामने रेली सुटका…

धनराज व्हॉट्सअॅप आणि फेसबुक वापरत होता पण इन्स्टाग्रामवर तो फारसा अॅक्टिव्ह नव्हता. त्यामुळे परवीनने सुटकेसाठी इन्स्टाग्रामचा वापर केला. परवीनचा मेसेज पाहिल्यानंतर तिच्या मैत्रिणीने पुणे मिरर या इंग्रजी वृत्तपत्राच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर तातडीने ही माहिती पुणे पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी सोमवारी परवीनची धनराजच्या घरातून सुटका केली. दरम्यान, सध्या धनराज पुणे पोलिसांच्या ताब्यात असून, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मारहाण करणे, धमकी देणे आणि डांबून ठेवणे अशा विविध कलमांखाली धनराजवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराजचे वडील व प्रसिद्ध उद्योगपती अरविंद मोरारजी यांचे २००५ मध्ये निधन झाले. धनराज हा विवाहित असून काही वर्षांपूर्वी त्याची पत्नी मुलासह घरातून निघून गेली होती. धनराज दारूच्या व्यसनाने ग्रासलेला असून, सध्या तो त्याच्या आईसोबत राहतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -