घरदेश-विदेशइराकच्या कुर्दिस्तान भागात इराणचा क्षेपणास्त्र हल्ला, गर्भवती महिलेसह १३ जण ठार

इराकच्या कुर्दिस्तान भागात इराणचा क्षेपणास्त्र हल्ला, गर्भवती महिलेसह १३ जण ठार

Subscribe

महसा अमिनीच्या मृत्यूनंतर हिजाबच्या वादावर जगभरातून टीकेला सामोरे जाणाऱ्या इराणने इराकच्या कुर्दिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका गर्भवती महिलेसह १३ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ५८ जण जखमी झाले आहेत. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डने हा हल्ला केला आहे.

कुर्दिस्तानवर हल्ला करण्यासाठी इराणने क्षेपणास्त्रांची तसेच ड्रोनची मदत घेतली आहे. कुर्दिस्तानमधील इराणविरोधी गटांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डने म्हटले आहे की त्यांनी हल्ल्यात अलीकडील दंगलींचे समर्थन करणाऱ्या लोकांना ठार केले आहे.

- Advertisement -

आम्ही तुम्हाला सांगतो की सुमारे 12 दिवसांपूर्वी इराण पोलिसांनी महसा अमीनी नावाच्या महिलेला हिजाब न घातल्यामुळे ताब्यात घेतले होते. अमिनीचा कोठडीत मृत्यू झाला, त्यानंतर संपूर्ण इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शने तीव्र झाली.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -