घर ताज्या घडामोडी रेल्वे प्रवाशांचा वैयक्तिक डाटा विकला जातोय? वाचा नेमके प्रकरण काय?

रेल्वे प्रवाशांचा वैयक्तिक डाटा विकला जातोय? वाचा नेमके प्रकरण काय?

Subscribe

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रवाशांचा वैयक्तिक डाटा डार्क वेबवर शुल्लक किंमतीत विकला जात असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलीस यंत्रणा सतर्क झाले असून, अधिक तपास करत आहेत.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रवाशांचा वैयक्तिक डाटा डार्क वेबवर क्षुल्लक किंमतीत विकला जात असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलीस यंत्रणा सतर्क झाले असून, अधिक तपास करत आहेत. याबाबत एका अहवालातील माहितीनुसार, रेलयात्री अॅपवरुन हॅक करण्यात आलेल्या माहितीच्या डाटाचा एक महत्त्वपूर्ण सेट एका डार्क वेब फोरमवर विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. (irctc authorised railyatri app users data was put up for sale on dark web forum)

रेलयात्री भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनद्वारे (आयआरसीटीसी) ऑथोराईज्ड अॅप आहे. या अॅपच्या माध्यमातून यूजर्स तिकीट बूकिंग, पीएनआर स्टेट्स चेक करतात. देशातील ट्रेन यात्रेसंदर्भात इतर माहितीही या अॅपद्वारे प्रवाशांना मिळते. सध्या सायबर पोलीस लीक झालेल्या अॅपवर नजर ठेवून आहेत. यासंदर्भातील चौकशी पूर्ण केल्यानंतर संबंधित अधिकारी सतर्क राहणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, गुगल प्ले स्टोअरच्या माहितीनुसार आतापर्यंत अंदाजीत ५ कोटींपेक्षा अधिक डाऊनलोड्स या अॅपसाठी मिळाले आहेत. फोन नंबरसारख्या डाटा पॉईंट्ससह दुरुपयोग करण्याची शक्यता वाढते आहे. या नंबरचा वापर लोकांना सेक्सटॉर्शन, पार्टटाईम जॉब रॅकेट्स आणि पोलीस अधिकारी बनून आर्थिक धोकासारख्या अपराधासाठी टार्गेट करण्यासाठी वापरला जात आहे. शिवाय नाव इमेल आयडीचा वापर बोगस दस्तावेज वनवण्यासाठीही करण्याची शक्यता यात वाढते.

हॅक झालेल्या रेलयात्री अँपकडून अंदाजे ३१ दशलक्ष डेटा पॉइंट्सचा संच डार्क वेबवर विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. युनिट ८२ नावाच्या हॅकरने पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली होती. डिसेंबर २०२२ मध्ये डेटा हॅक झाल्याचा दावा हॅकरने केला आहे. दरम्यान, डेटा ब्रीच फोरमवर विक्रीसाठी ठेवला आहे. ‘त्यात एकूण ३,१०,६२,६७३ डेटा पॉइंट आहेत. हा संपूर्ण डेटा अंदाजे १२.३३ गीगाबाइट्स आहे. बायोमध्ये असेही म्हटले आहे की, युनिट८२ इस्रायलमध्ये आहे आणि ६ ऑगस्ट २०२२ पासून ब्रीच्ड फोरमचा सदस्य आहे’, असे फोरमवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


- Advertisement -

हेही वाचा – काँग्रेसच्या ८५व्या राष्ट्रीय अधिवेशनापूर्वीच ‘या’ नेत्यांच्या घरांवर ईडीची छापेमारी

- Advertisment -