घरदेश-विदेशमहिला रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! IRCTC कडून मिळतेय कॅशबॅक आणि डिस्काऊंटची ऑफर

महिला रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! IRCTC कडून मिळतेय कॅशबॅक आणि डिस्काऊंटची ऑफर

Subscribe

भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (Indian Railway Catering and Tourism Corporation) रक्षाबंधन सणानिमित्त महिला प्रवाशांना तिकिटावर विशेष सुट आणि कॅशबॅकची ऑफर दिली आहे. सध्या तेजस एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांनाच या ऑफरचा फायदा घेता येईल. पण आयआरसीटीसीकडून इतर सणांनिमित्तही ट्रेन प्रवासासाठी काही खास ऑफर लाँच करण्याची योजना आखली जात आहे. IRCTC ने याबाबत अधिकृत माहिती देत सांगितले की, लखनऊ- दिल्ली आणि अहमदाबाद- मुंबई मार्गांवरून धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना कॅशबॅक आणि डिस्काउंटची ऑफर दिली आहे.

IRCTC च्या माहितीनुसार, रक्षाबंधननिमित्त असणारी ही ऑफर १५ ऑगस्टपासून ते २४ ऑगस्टपर्यंत असणार आहे. प्रीमियम ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाश्यांनाच या ऑफरचा फायदा घेता येईल. यामध्ये महिला प्रवाशांना ५ टक्के कॅशबॅकची ऑफर मिळणार असून प्रवासादरम्यान या ऑफरचा फायदा घेऊ शकतात. तेजस एक्सप्रेसच्या तिकिट बुकिंगसाठी वापरलेल्या बँक खात्यात कॅशबॅक थेट डेबिट केली जाईल. यात कॅशबॅक ऑफरची घोषणा करण्यापूर्वी तिकीट बुक करणाऱ्या महिला प्रवाशांनाही प्रवासादरम्यान या ऑफरचा फायदा मिळणार आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -