घरदेश-विदेशIRCTCची वेबसाइट 12 तासांपासून बंद; रेल्वे स्टेशनवर अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू

IRCTCची वेबसाइट 12 तासांपासून बंद; रेल्वे स्टेशनवर अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू

Subscribe

नवी दिल्ली | भारतीय रेल्वेची आयआरसीटीसीची वेबसाइट गेल्या 12 तासांपासून बंद आहे. आयआरसीटीसी वेबसाईटचा सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती IRCTCट्वीट करत दिली आहे. प्रावाशांची गैरसोय होऊ नये म्हणून अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत. तब्बल १३ तासानंतर IRCTC वेबसाइट आणि अॅप  सुरू झाले आहे.

आयआरएसआयटीने ट्वीट करत माहिती दिली की, “काही तांत्रिक बिघाड झाल्याने ऑनलाइन तिकीट बुकिंग होऊ शकत नाही. हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी टीम काम करत आहे. लवकरच तांत्रिक बिघाड दुरुस्त केला जाईल. रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी Amazon, Make My Trip सारख्या B2C प्लेयर्सवरुन या अॅपचा वापर करू शकता,”, अशी माहिती ट्वीटमध्ये दिली आहे.

- Advertisement -

आयआरसीटीची वेबसाइट सोमवारीमध्ये रात्रीपासून बंद आहे. या वेबसाइट आणि अॅपवरून 80 टक्के बुकिंग केले जाते. पण, IRCTC ॲप आणि साइट स्टॉल झाल्यामुळे वापरकर्त्यांना अडचणीला सामोरे जावे लागे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -