Homeताज्या घडामोडीIRCTC Down : आयआरसीटीसीची ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा ठप्प; नेमकं काय घडलं?

IRCTC Down : आयआरसीटीसीची ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा ठप्प; नेमकं काय घडलं?

Subscribe

प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आयआरसीटीसीने तत्काळ तिकीट बुक करण्याची वेळ सकाळी 10 अशी केली आहे. तर स्लीपर क्लाससाठी तत्काळ तिकीट बुक करण्याची वेळ सकाळी 11 वाजता अशी ठेवली आहे. परंतु, आज सकाळी अचानक वेबसाईट ठप्प झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

मुंबई : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या वाढत्या प्रवासी संख्येमुळे प्रवाशांचा प्रवास सुखर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध सुविधा सुरू करण्यात आल्या. विशेष म्हणजे प्रवाशांचा प्रवास जलद होण्याकरीता रेल्वेने ऑनलाइन तिकीट सेवा सुरू केली. त्यानुसार, भारतीय रेल्वेचे ई-तिकीटिंग प्लॅटफॉर्म, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ऑनलाइन वेबसाइट आणि मोबाइल ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना ऑनलाइन तिकीट काढता येते. पण आज (गुरूवार दि. 26 डिसेंबर) सकाळच्या सुमारास ऑनलाइन तिकीट काढताना प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. कारण तिकीट बुकिंगची करणार IRCTC ची ऑनलाइन सेवा अचानक ठप्प झाली. मात्र, यावर आयआरसीटीसीकडून स्पष्टीकरण देण्यात आले त्यानुसार, देखभाल कार्यासाठी आयआरसीटीसीची वेबसाईट आणि अॅप बंद ठेवण्यात आले आहे. (IRCTC website down online railway ticket booking not available at today morning)

ऑनलाइन तिकीट बुकिंग अचानक ठप्प झाल्यानंतर IRCTC वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, “देखभालीच्या कामामुळे, सध्या ई-तिकीटिंग सेवा उपलब्ध होणार नाही. कृपया नंतर प्रयत्न करा. तिकीट रद्द करण्यासाठी / टीडीआरसाठी कृपया कस्टमर केअर नंबर 14646, 08044647999 आणि 08035734999 वर कॉल करा किंवा [email protected]’ वर मेल करा”, अशी माहिती देण्यात आली होती.

- Advertisement -

प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आयआरसीटीसीने तत्काळ तिकीट बुक करण्याची वेळ सकाळी 10 अशी केली आहे. तर स्लीपर क्लाससाठी तत्काळ तिकीट बुक करण्याची वेळ सकाळी 11 वाजता अशी ठेवली आहे. परंतु, आज सकाळी अचानक वेबसाईट ठप्प झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

दरम्यान, आयआरसीटीसीची वेबसाइट बंद झाल्यामुळे त्याच्या शेअर्सवरही परिणाम झाला आहे. गुरुवारच्या व्यवहारात आयआरसीटीसीचे शेअर्स जवळपास एक टक्क्यांनी घसरले. वेबसाईट डाऊन झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे मानले जात आहे. गेल्या एका आठवड्यात IRCTC स्टॉक 4 टक्क्यांनी घसरला आहे.

- Advertisement -

2024 मध्ये, IRCTC चे शेअर्स जवळपास 10 टक्क्यांनी घसरले आहेत. परिणामी गुंतवणूकदारांना तोट्याचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, रेल्वेने 1 नोव्हेंबरपासून नवीन प्रणाली लागू केली आहे. त्यानुसार, चार महिने आधी तिकीट बूक करण्याची प्रक्रिया आता दोन महिन्यांवर आणण्यात आली आहे. म्हणजेच प्रवासाच्या 120 दिवस अगोदर बुक केली जाणारी तिकीट आता प्रवसाच्या 60 दिवस आधी बुक करता येणार आहे.


हेही वाचा – Air travel rules : नवीन वर्षात विमानप्रवास करत असाल तर, हा नवीन नियम जाणून घ्या!

Edited By Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -