घरदेश-विदेशउडत्या विमानात दारूसाठी वकिलीन बाईचा थयथयाट

उडत्या विमानात दारूसाठी वकिलीन बाईचा थयथयाट

Subscribe

एअर इंडियाच्या विमानात एका महिला प्रवासीने दारूसाठी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एअर इंडियाच्या विमानात दारूसाठी महिला प्रवाशाने धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या महिलेनी विमान कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली असून एअर इंडियाबद्दल ही अपशब्दांचा वापर केला आहे. हीथ्रो विमानतळावर विमान उतरवल्यानंतर या महिलेला अटक करण्यात आली. या घटनेनंतर या महिलेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अद्याप महिला पोलिसांच्या ताब्यात असल्याचे माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. महिला प्रवाशाने अधिक मद्यपान केल्यामुळे शिवीगाळ केली असल्याचे सांगितले जात आहे. प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडियोमध्ये ही महिला विमानातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करताना दिसत आहे. प्रवासादरम्यान ही घटना घडल्यामुळे इतर प्रवाशांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

एअर इंडियाचे विमान AI-131 या विमानातून १० नोव्हेंबर रोजी ही महिला प्रवास करत होती. ही महिला मूळ आयरलँड येथील रहिवाशी आहे. भारतात ती पर्यटनासाठी अलेली. मुंबईतून लंडन येथे  जाण्यासाठी तिने फ्लाईटचे बुकिंग केले होते. यासाठी एअर इंडियाचे विमानाचे तिकीट महिलने काढले होते. प्रवासादरम्यान महिलेे मद्यपान केले होते. यानंतर विमानात धुम्रपान आणि अधिक मद्याची मागणी केली. मद्य देण्यासाठी विमान कर्मचाऱ्यांनी नकार दिल्यामुळे या महिलेचा पारा चढला. आपण आंतरराष्ट्रीय वकील असल्याची बतावणी या महिलेने केली. मला मद्य दिले नाही हे मानवी अधिकाराचे उल्लंघन असल्याचे महिलेने सांगितले. विमान कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत ही महिला विमानाच्या किचनमध्ये घूसली. मात्र कर्मचाऱ्यांनी तिला अडवले असता तिने किचनमधील समानाला लाथ मारली.

“महिला प्रवाशी १ जे सीटवर बसली होती. मद्यापान केल्यानंतर ही महिला इकनॉमी क्लासमध्ये गेली. महिलेला धुम्रपान करायचे होते मात्र विमानात ज्वलंत वस्तूंना परवानगी नव्हती. यानंतर तिने रेड व्हाईनची मागणी केली. मात्र महिलेने अधिक मद्यपान केले असल्यामुळे आम्ही तिला दारू देण्यास नकार दिला. त्यावेळी महिलेने चिडून वकील असल्याचा दावा केला. दारू न दिल्यास ती एअर इंडियाविरोधात न्यायालयात तक्रार करेल असे तिने सांगितले. मात्र एअर इंडियामध्ये नियमानुसार प्रवाशांना एक ठराविक मर्यादे नुसारच मद्य दिल्या जाते.” – विमान कर्मचारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -