घरCORONA UPDATEम्हणून होत आहे म्युकरमायकोसिसचे सर्वात जास्त संक्रमण, AIIMSच्या प्रमुखांनी दिली महत्त्वाची माहिती

म्हणून होत आहे म्युकरमायकोसिसचे सर्वात जास्त संक्रमण, AIIMSच्या प्रमुखांनी दिली महत्त्वाची माहिती

Subscribe

स्टेरॉइडचा गैरवापर करणे हे म्युकरमायकोसिसचे संक्रमण वाढण्याचे प्रमुख कारण

राज्यात कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस (Mucormycosis) या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण अतिशय वेगाने वाढलेले आपल्याला पहायला मिळत आहे. म्युकरमायकोसिसला काळी बुरशी किंवा ब्लॅक फंगस असेही म्हटले जाते. म्युकरमायकोसिस म्हणजे काय? हा आजार कसा होतो याविषयी अनेकांनी माहिती दिली. म्युकरमायकोसिसचे प्रमाण वाढण्यामागे दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्या रुग्णांना डायबेटीज आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली असेल आणि उपचारादरम्यान त्यांना स्टेरॉइड्स दिले जात असतील तर अशा रुग्णांना म्युकरमायकोसिसच्या संक्रमणाचा सर्वाधिक धोक आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

डॉ. गुलेरिया यांनी सांगितल्यानुसार, स्टेरॉइडचा गैरवापर करणे हे म्युकरमायकोसिसचे संक्रमण वाढण्याचे प्रमुख कारण बनले आहे. त्यामुळे येत्या काळात स्टेरॉइडचा अत्यंत बेजाबाबदारपणा, त्याचा चुकीचा वापर करणे थांबवायला हवे, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सर्व रुग्णालयांना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही ठराविक उपचारांचे प्रोटोकॉल दिले आहेत त्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले. सध्या एम्स रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे २३ रुग्ण आहेत. त्यातील २० रुग्ण कोरोनाग्रस्त आहेत,असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

म्युकरमायकोसिस हा आजार आधीही होता. परंतु त्याचा संसर्ग फार दुर्मिळ होता. कोरोनाच्या काळात गेल्या काही दिवसांपासून त्याचे प्रमाण अचानक वाढले आहे. ज्याचे कारण स्टेरॉइड अतिवापर करणे आहे. म्युकरमायकोसिसचे विषाणू हवा,माती, आणि जेवणातही आढळतात असे डॉ. गुलेरीया यांनी सांगितले.

डॉ. गुलेरिया यांनी म्युकरमायकोसिसची काही लक्षणे सांगितली. त्यांनी असे म्हटले आहे की, ICMR (Indian Council of Medical Research) रुग्णांच्या चेहऱ्याच्या एका बाजूला सायनसच्या वेदना होणे,नाक बंद होणे, डोकेदुखणे,सूज येणे, दांतामध्ये वेदना होणे ही प्राथमिक लक्षणे आहेत. यावर डॉक्टरांनी लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे डॉ. गुलेरिया यांच्या मते म्युकरमायकोसिस हा नाक डोळे, मेंदूवर हल्ला करत असला तरी त्याचा आपल्या फुफ्फुसांवरही संसर्ग होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Steroid : कोरोनाबाधितांना दिल्या जाणाऱ्या अनावश्यक स्टेरॉइंट्सचे गंभीर परिणाम, तज्ज्ञांचा इशारा

 

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -