घर देश-विदेश राज्यकर्त्यांचा कारभार शुद्ध आहे का? ठाकरे गटाचा मोदी सरकारला थेट सवाल

राज्यकर्त्यांचा कारभार शुद्ध आहे का? ठाकरे गटाचा मोदी सरकारला थेट सवाल

Subscribe

मुंबई : गेल्या वर्षाप्रमाणे यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्तही वेगवेगळे अभियान राबविले गेले. ‘हर घर तिरंगा’ आणि ‘माझी माती-माझा देश’ हे उपक्रम घोषित झाले. या अभियानांमागे देशभक्तीची भावना जागृत व्हावी हा उद्देश आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. ते खरे असेलही आणि हे उपक्रम चांगलेच आहेत, परंतु त्या सोबतच राज्यकर्त्यांचा कारभारही तेवढाच खरा आणि शुद्ध आहे का? असा बोचरा सवाल ठाकरे गटाने मोदी सरकारला केला आहे.

हेही वाचा – PM Modi : देशातील महिलांचे मोदींने केले कौतुक, सांगितला परदेशातील ‘तो’ प्रसंग

- Advertisement -

देशाचा स्वातंत्र्यदिन आज देशभरात नेहमीच्या उत्साहात साजरा होत आहे. तो उत्साहातच साजरा व्हायला हवा. कारण हजारो ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या, क्रांतिकारकांच्या बलिदानातून, त्यागातून हा देश स्वतंत्र झाला आहे. स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ गेल्या वर्षी देश-परदेशांत उत्साहातच साजरा झाला होता. अर्थात, केंद्र सरकारच्या पातळीवर हा उत्साह असा होता की, जणू विद्यमान सत्तापक्षानेच देशाचा स्वातंत्र्यलढा एकहाती जिंकला आणि नंतरच्या 75 वर्षांत त्यांच्यामुळेच देश प्रगतीची आजची उंची गाठू शकला, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात करण्यात आली आहे.

उपक्रम चांगलेच आहेत, पण…
गेल्या वर्षाप्रमाणे यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्तही वेगवेगळे अभियान राबविले गेले. ‘हर घर तिरंगा’ आणि ‘माझी माती-माझा देश’ हे उपक्रम घोषित झाले. ‘मिट्टी को नमन, वीरों को वंदन’ या घोषवाक्यासह ‘माझी माती-माझा देश’ हा उपक्रम 9 ऑगस्टपासून देशभरात राबविला गेला. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘पंचप्रण शपथ’ घ्यायची आणि मातीचा दिवा हातात घेऊन काढलेला ‘सेल्फी’ संबंधित संकेतस्थळावर अपलोड करायचा, असे त्याचे स्वरूप होते. हे उपक्रम चांगलेच आहेत, परंतु त्या सोबतच राज्यकर्त्यांचा कारभारही तेवढाच खरा आणि शुद्ध आहे का? असा प्रश्न ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – PM Modi : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे मणिपूरच्या नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन

साम, दाम, दंड, भेद याचा अनिर्बंध वापर
हे सरकार सत्तेत आले तेव्हापासूनच, म्हणजे 2014 पासूनच या सरकारचा चेहरा वेगळा आणि मुखवटा वेगळा आहे. वेगवेगळे ‘मुखवटे’ चढवून स्वतःला देशभक्त भासवायचे आणि त्या मुखवट्याआड लपून आपली हुकूमशाही राबवायची. एकीकडे स्वातंत्र्याचा घोष करायचा आणि दुसरीकडे त्याच स्वातंत्र्याची गळचेपी करायची. स्वातंत्र्य, लोकशाही फक्त तोंडी लावायला, बाकी कारभार दडपशाही आणि निरंकुश दबाव तंत्राचा. साम, दाम, दंड, भेद या नीतीचा जेवढा अनिर्बंध वापर देशात मागील नऊ वर्षांत झाला, तेवढा कधीही झालेला नाही. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून राजकीय गुलामगिरी लादली जात आहे, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisment -