घरताज्या घडामोडीकोरोनाचा 'NeoCov' हा नवा व्हेरिएंट धोकादायक आहे का ? जाणून घ्या तज्ज्ञांचे...

कोरोनाचा ‘NeoCov’ हा नवा व्हेरिएंट धोकादायक आहे का ? जाणून घ्या तज्ज्ञांचे म्हणणे….

Subscribe

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या सावटामुळे होरपळून गेले आहे. त्यातच कोरोनाचे नवे व्हेरिएंट डोके वर काढत आहेत. कोरोना डेल्टा व्हेरिएंट आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका अजून संपला नव्हता तोच एका नवीन विषाणूच्या जन्माने जगभरातील नागरिकांची चिंता वाढवली आहे.

गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या सावटामुळे होरपळून गेले आहे. त्यातच कोरोनाचे नवे व्हेरिएंट डोके वर काढत आहेत. कोरोना डेल्टा व्हेरिएंट आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका अजून संपला नव्हता तोच एका नवीन विषाणूच्या जन्माने जगभरातील नागरिकांची चिंता वाढवली आहे. चीनच्या वुहान लॅबमध्ये, शास्त्रज्ञांनी वटवाघुळांमध्ये आढळलेल्या निओकोव्ह विषाणूबद्दल एक चेतावणी जारी केली. त्यांनी सांगितले की, त्याचा संसर्ग झालेल्या तीनपैकी एकाचा मृत्यू होऊ शकतो. मात्र, सध्या या विषाणूपासून कोणत्याही प्रकारचा धोका माणसांना नाही, अशाप्रकारचा दिलासा तज्ज्ञांनी दिला आहे.

तज्ज्ञांनी सांगितले की NeoCoV विषाणूद्वारे वापरलेले बॅट रिसेप्टर्स मानवी ACE2 रिसेप्टर्सला जोडू शकत नाहीत जोपर्यंत ते महत्त्वपूर्ण उत्परिवर्तन प्राप्त करत नाहीत. चिनी संशोधकांना असे आढळून आले की NeoCoV द्वारे वापरलेले बॅट रिसेप्टर्स SARS-CoV2 द्वारे मानवांना संक्रमित करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या बॅट रिसेप्टर्ससारखेच होते.निओकोव्ह हा वटवाघळांमधला विषाणू मानवामध्ये जाण्याचा धोका कमी आहे. संशोधकांनी नमूद केले की NeoCoV त्याच्या सध्याच्या स्वरूपात मानवांना संक्रमित करत नाही, मात्र या व्हेरिएंटमध्ये बदल झाल्यास त्यामुळे नुकसान होऊ शकते.

- Advertisement -

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत फक्त सोशल मीडियावर नियोकोव्हबद्दल बोलले जात आहे, परंतु यामुळे कोणत्याही व्यक्तीला संसर्ग झाल्याची कोणतीही माहिती अजूनही नाही. दिल्लीस्थित CSIR-IGIB मधील प्रमुख शास्त्रज्ञ विनोद स्कारिया यांनी सांगितले की, झुनोटिक स्पिलओव्हर – प्राण्यांपासून मानवांमध्ये विषाणूचे संक्रमण – ही एक दुर्मिळ घटना आहे. “व्हायरस, त्याच्या नैसर्गिक स्वरूपात, मानवांना संक्रमित करत नाही. आणि त्याचा संसर्ग अद्याप मानवांना झालेला नाही.

कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंंटवर WHO चे म्हणणे काय?

दक्षिण आफ्रिकेमधील वटवाघळांमध्ये कोरोनाचा नवा अवतार सापडल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनच्या वुहान मधील संशोधकांच्या एका टीमला दक्षिण आफ्रिकेच्या वटवाघळांमध्ये कोरोनाचा अवतार आढळला आहे. कोरोनाच्या या नव्या अवताराला निओकोव्ह (NeoCov) असे नाव देण्यात आले आहे. हा व्हायरस येत्या भविष्यात मनुष्यासाठी धोका निर्माण करू शकतो, असे चीनच्या वैज्ञानिकांच्या अध्ययनात म्हटले आहे. कोरोना व्हायरसचे एक मोठे कुटुंब आहे, जे सामान्य सर्दीपासून ते गंभीर श्वसन सिंड्रोम (SARS) पर्यंत आजाराचे कारण ठरतात. जागतिक आरोग्य संघटना कोरोनाच्या नव्या अवताराबाबत म्हणाली की, ‘या संशोधनाबाबत माहित आहे. परंतु हा व्हायरस खरंच मनुष्यासाठी धोकादायक असू शकतो का? यासाठी आणखीन अध्ययन करण्याची आवश्यकता आहे.’

- Advertisement -

हे ही वाचा – लसीमुळे कोरोनासह ‘या’ 20 आजारांपासून राहता येते दूर; WHO ची माहिती


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -