मुंबई : दिल्लीत जी-20 शिखर परिषद सुरू आहे. आज शेवटचा दिवस असून अनेक देशांचे प्रमुख संध्याकाळपर्यंत आपापल्या देशात परततील. तर दुसरीकडे, राजधानी दिल्लीत सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे दिल्लीतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात दावा करण्यात आला आहे की, पावसामुळे जी-20साठी उभारण्यात आलेल्या भारत मंडपमचा काही भाग जलमय झाला आहे. यावरून, सरकारचे हे कामही 50 टक्के कमिशनवर होते का? असे विचारत काँग्रेसने निशाणा साधला आहे.
खोखले विकास की पोल खुल गई
G20 के लिए भारत मंडपम तैयार किया गया। 2,700 करोड़ रुपए लगा दिए गए।
एक बारिश में पानी फिर गया… pic.twitter.com/jBaEZcOiv2
— Congress (@INCIndia) September 10, 2023
हेही वाचा – पंतप्रधान मोदी लोकांची चांगली करमणूक करीत आहेत…, संजय राऊत यांची टीका
प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे G-20 शिखर परिषदेचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. परिषदेसाठी प्रशासनाने राजधानीत चोख व्यवस्था केली आहे, मात्र शनिवारी रात्री उशिरा आणि रविवारी सकाळी झालेल्या पावसानंतर भारत मंडप परिसरात पाणी साचले आहे. तथापि, नवी दिल्ली महानगरपालिकेने (NDMC) भारत मंडपमबाहेर साचलेले पाणी काढण्यासाठी मशीन बसवले आहेत. जेथे पाणी साचण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी आधीपासूनच 100 पंप ठेवण्यात आले आहेत. याशिवाय 50 मोबाइल वॉटरपंप देखील तैनात आहेत. हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्यानंतर एनडीएमसीने विविध मार्गांवरील पावसाच्या पाण्याचा निचरा जिथे होतो, त्या केंद्रावर लक्ष केंद्रीत केले आहे, अशी माहिती पालिकेचे उपाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी दिली.
सरकारचा भोंगळ कारभार उघड!#G20 परिषदेच्या ‘भारत मंडपम’ चे पावसामुळे वाजले तीनतेरा…3000 कोटींचा खर्च, पण पाणी साचण्याची व्यवस्था नाही. सरकारचे हे कामही ५०% कमिशनवर होते का? pic.twitter.com/XKBYe9qtZW
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) September 10, 2023
हेही वाचा – मोदी सरकारच्या मनात आले म्हणून…, संजय राऊत यांची भाजपावर घणाघाती टीका
मात्र, यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. ‘जी-20साठी भारत मंडपम उभारण्यात आला होता. त्यासाठी 2700 कोटी रुपये खर्च करण्यात आले, पण एका पावसात त्यावर पाणी फिरले. विकासाचा पोकळपणा उघड झाला आहे,’ असे काँग्रेसने म्हटले आहे. तर, सरकारचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. जी-20 परिषदेच्या ‘भारत मंडपम’चे पावसामुळे वाजले तीनतेरा… 3000 कोटींचा खर्च केला, पण पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नाही. सरकारचे हे कामही 50 टक्के कमिशनवर होते का? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसने केला आहे.