Independence Day 2022: यंदाचा स्वातंत्र्य दिन नेमका ७५ वा की ७६? का होतोय गैरसमज? जाणून घ्या नेमकं उत्तर

विविध स्तरांवर समाजातील प्रत्येक वर्गाकडून देशाच्या स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाचा आनंद साजरा केला जात आहे आणि तो ही अगदी अनंदात आणि उत्सहात.

दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीय खूप उत्साहात आणि आनंदात साजरा करतात. यावर्षी देशात 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरातच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. आजच्या दिवशी संपूर्ण देशवासीयांच्या मनात आनंदाची आणि देशाप्रती अभिमानाची भावना असते. देशाच्या अमृत महोत्सवाचा आनंद आणि उत्साह शासन दरबारीच नाही तर भारताच्या प्रेतेक घरात ओसंडून वाहत आहे. विविध स्तरांवर समाजातील प्रत्येक वर्गाकडून देशाच्या स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाचा आनंद साजरा केला जात आहे आणि तो ही अगदी अनंदात आणि उत्सहात.

हे ही वाचा – …आज अमेरिका भारतीयांसोबत; गांधींचा उल्लेख करत बायडेन यांच्याकडून भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या स्वातंत्र्य सेनानींचे सुद्धा स्मरण केले जाते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पोस्ट शेअर करण्यात येत आहेत. ठीक ठिकाणी स्वातंत्र्यदिनानिमित्त फलक सुद्धा लावण्यात आले आहेत. देशवासीय एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच यंदाचा स्वातंत्र्य दिन नेमला 75 वा की 76 वा यावरून बराच गोंद झाल्याचं दिसत आहेत. काही ठिकाणी 75 वा स्वातंत्र्य दिन तर काही ठिकाणी 76 व स्वातंत्र्यदिन असा उल्लेख केलेला पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा – ‘त्या’ दहशतवाद्याच्या कुटुंबीयांनी फडकावला राष्ट्रध्वज; आपलं सगळं काही भारतात म्हणत परतण्याची मागणी

नेमका गोंधळ का होतोय ?

ब्रिटिश राजवटीतून भारत मुक्त झाला आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारतीय इतिहासातील एक महत्वपूर्ण दिवस आहे आणि त्या नंतर 15 आगस्ट 1948 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 1 वर्ष पूर्ण झाले. हा जल्लोष मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. तेव्हा स्वातंत्र्याचं दुसरं वर्ष सुरु झालं तर पहिल्याची वर्षपूर्ती झाली. जेव्हा स्वातंत्र्य दिन अला उल्लेख केला जातो तेव्हा त्या मूळ दिवसाची तारीखही गणली जाते. अशाच प्रकारे 1957 ला देशाच्या स्वातंत्र्याची दशकपूर्ती साजरा करण्यात आली. पण तो देशाचा 11 वा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा झाला. त्याचप्रमाणे 2022 सालात म्हणजे या वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली तर 76 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. दरम्यान देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त विविध स्तरातून भारतावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन चिरायू होवो हीच सदिच्छा.

हे ही वाचा – Independence Day 2022: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गुगलचं हे नवीन ‘डुडल’