घरदेश-विदेशतुमचा पार्टनर 'सायकोपॅथ' आहे की नाही? हे आहेत 6 संकेत

तुमचा पार्टनर ‘सायकोपॅथ’ आहे की नाही? हे आहेत 6 संकेत

Subscribe

प्रत्येक नात्यात परस्पर प्रेम, विश्वास आणि आदर असायला हवा. पण जर एखाद्याला असे वाटत असेल की त्यांच्या नात्यात काहीतरी गडबड किंवा काही चुकीचं घडत आहे

महाराष्ट्र आणि दिल्लीला हादरविणारी घटना सोमवारी उघडकीस आली. महाराष्ट्रामधील श्रद्धा वायकर हिची हत्या करून तिचे 35 तुकडे करण्यात आलेआणि दिल्लीतील जंगलात वेगवगेळ्या भागात फेकण्यात आले. महाराष्ट्रातील पालघरमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वायकर आणि तिचा प्रियकर आफताब यांची एका डेटिंग अॅपवरून मैत्री झाली. दोघेही 2018 पासून एकत्र होते आणि अशातच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. काही काळाने त्यांच्या नातेसंबंधात कटुता आली. रोजच्या भांडणाला आणि त्रासाला कंटाळून श्रद्धाने हे नाते संपवायचे ठरवले. न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आफताब अमीन पूनावाला असे आरोपीचे नाव असून त्याने 18 मे रोजी 26 वर्षीय श्रद्धाची गळा दाबून हत्या केली होती.

या आधी हत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण या सगळ्यात असा प्रश्न उपस्थित होतो की, एखाद्या व्यक्तीचा जोडीदार मानसिक दृष्ट्या निरोगी आहे की नाही हे कसे समजेल?

- Advertisement -

“मनोरुग्ण आणि सोशियोपॅथ हे दोन्ही प्रकारचे लोक आहेत आणि दोघेही कोणाचेही नुकसान करू शकतात. प्रत्येक नात्यात परस्पर प्रेम, विश्वास आणि आदर असायला हवा. पण जर एखाद्याला असे वाटत असेल की त्यांच्या नात्यात काहीतरी गडबड किंवा काही चुकीचं घडत आहे, एकमेकांवर विश्वास नाही. वारंवार भांडणं होत आहेत, प्रत्येक गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असेल तर हे संकेत असतात की तुम्ही तुमच्या पर्सनल आयुष्यात जे घडत आहे त्याकडे दुर्लक्ष करू नये. आणि त्यासाठी तुम्ही लगेचच उपचार केले पाहिजेत. असं क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, मणिपाल हॉस्पिटल पालम विहार, गुरुग्रामच्या डॉ श्वेता शर्मा म्हणाल्या.

सायकोपॅथ कोण असतात
‘सायकोपॅथ’ हा शब्द अनेकांनी ऐकला असेल, हा शब्द टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये सर्वाधिक वापरला जातो. हा शब्द सामान्यतः अशा व्यक्तीसाठी वापरतात ज्यांचे वर्तन समाजासाठी योग्य नसते. असामाजिक व्यक्तिमत्व विकार (एएसपीडी) हा वैद्यकीय जगतातील मनोरुग्णांशी संबंधित आजार आहे. मेयो क्लिनिकच्या मते, एएसपीडी हा एक मानसिक विकार आहे ज्यामध्ये लोकांना योग्य आणि अयोग्य, सहानुभूती किंवा इतर लोकांचे हित कष्ट आहे हे समजण्यासाठी सक्षम नसतात.

- Advertisement -

सायकोपॅथ लक्षणे –

 अश्या व्यक्ती पश्चात्ताप न करता इतरांनाही हानी पोहोचवू शकतात –

एएसपीडीने ग्रस्त असलेले लोक कोणालाही हानी पोहोचवू शकतात आणि त्यांना त्याबद्दल पश्चात्ताप होत नाही. नुकसान आर्थिक असो, भावनिक असो किंवा शारीरिक असो त्यांनी नुकसान केले आहे त्याचा त्यांना पश्चाताप नसतो. तज्ज्ञांच्या मते, अशा लोकांचा संघटित गुन्हेगारीत सहभाग असण्याची शक्यता जास्त असते.

तुमचा जोडीदार तुमच्यासारखाच दिसतो का –

सायकोपॅथ्स अँड लव्हच्या लेखिका अॅडेलिन बर्च यांच्या मते, असामाजिक व्यक्तिमत्व विकार असलेले लोक त्यांच्या जोडीदारांवर विजय मिळवण्यासाठी त्यांचे अनुकरण करतात.

अशा व्यक्तींना जास्त मित्र नसतात –

ASPD असणा-या लोकांमध्ये सहानुभूती आणि करुणा भाव नसतो , यामुळे अश्या व्यक्तींना जास्त मित्र नसतात. त्याचे स्वतःकडेच लक्ष असते, त्यामुळे त्यांची कोणाशी मैत्री होऊ शकत नाही. अशा व्यक्तींसाठी कोणतेही नाते दीर्घकाळ टिकवणे कठीण असते. या व्यक्ती नेहमीच समोरच्यावर अधिकार गाजवतात.

 स्वतःच्या फायद्याचा विचार – 

ASPD असलेलया व्यक्ती केवळ त्यांच्या स्वतःच्या फायद्याचा विचार करतात, मेयो क्लिनिकच्या मते, अशा व्यक्ती खोटे बोलतात, चोरी करतात आणि त्यांच्या जोडीदारालाही दुखावतात. अशा स्वभावामुळेच त्यांचे इतरांशी पटत नाही.

 सहानुभूती नसते – 

अशा लोकांना सहानुभूती नसते, अशा व्यक्ती एखाद्याला जीवेमारू शकतात. एएसपीडी असलेली व्यक्ती अनेकदा हिंसक पद्धतीने वागतात.

 ASPD असलेले लोक ओळखणे कठीण आहे – 

या आजाराने ग्रस्त लोक ओळखणे फार कठीण आहे, कारण हे लोक इतरांची मने कशी जिंकायची हे जाणतात, खोटी सहानुभूती दाखविण्यात ते माहिर असतात. एएसपीडीने ग्रस्त असलेल्या व्यक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याशी बोलणारी व्यक्ती किती धोकादायक आहे हे समजणार नाही. ते त्यांच्या बोलण्याने इतरांची मनं जिंकतात.


हे ही वाचा – Inside Story! श्रद्धाला आधीच होता तिच्या हत्येचा संशय; मित्राला सांगितलं असं काही…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -