Tuesday, August 3, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी अफगाणिस्तानमधील भारतीय बांधकाम नेस्तनाबूत करा, ISIच्या तालिबानला सूचना

अफगाणिस्तानमधील भारतीय बांधकाम नेस्तनाबूत करा, ISIच्या तालिबानला सूचना

अफगाणिस्तानच्या विकासासाठी भारताने मोठी आर्थिक मदत केली

Related Story

- Advertisement -

तालिबाननं अफगाणिस्तानातील ८५ टक्के भागावर ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानात तालिबान आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यापासून काही अंतरावर आलं आहे. पाकिस्तानमधील दहशरवादी संघनांनीही तालिबानला आपला पाठिंबा दिला आहे. यामुळे तालिबान अधिक सक्षम झाला आहे. अफगाणिस्तानात भारत सरकारने अनेक इमारती तयार केल्या आहेत या सर्व इमारती पाडण्याच्या सूचना पाकिस्तानमधील आयएसआय संघटनेने दिल्या आहेत. तालिबान्यांना आतापर्यंत अफगाणिस्तानात शेकडो नागरिकांचे आणि सेन्यातील जवानांचे प्राण घेतले आहेत.

भारताने अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात बांधकाम केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारताकडून ४० हजार कोटीपर्यंतचा खर्च हा बांधकामांवर करण्यात आला आहे. यामध्ये अफगाणिस्तानात २१८ किमी लांबीचा डेलराम ते झरांज सलमा डॅमपर्यंत रस्ता तयार केला आहे. तसेच अफगाणिस्तानच्या संसद इमारतीचं काम भारताने २०१५ मध्ये पुर्ण केलं असून त्याचे लोकार्पण केलं आहे. अफगाणिस्तानच्या विकासासाठी भारताने मोठी आर्थिक मदत केली आहे. परंतु या बांधकामावर आता तालिबान आणि आयएसआ या गुप्तपचर संघटनेची नजर पडली आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी तालिबानला पाठिंबा दर्शवला असून अफगाणिस्तानच्या अशरफ गमी सरकारचा विरोध करण्यात आला आहे.

- Advertisement -

पत्रकार दानिश सिद्दीकीची हत्या

अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य परतल्यानंतर तालिबान संघटनेनं हैदोस घातला आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर सत्ता प्रस्थापित करण्याची मोहीम तीव्र केली आहे. रोज तालिबानी विविध जागांवर वर्चस्व मिळवत आहेत. अफगाणिस्तानला मदत करणारा हा तालिबानचा शत्रू आहे. तसेच तालिबानच्या कारवाईला विरोध करणाऱ्यांवर तालिबानी हल्ला करत आहेत. दानिश सिद्दीकीचीही अशाच प्रकारामुळे हत्या करण्यात आली आहे.

- Advertisement -