घरताज्या घडामोडीISI चे ५० तालिबानी दहशतवादी कश्मीरमध्ये, गु्प्तचर यंत्रणाकडून अलर्ट जारी

ISI चे ५० तालिबानी दहशतवादी कश्मीरमध्ये, गु्प्तचर यंत्रणाकडून अलर्ट जारी

Subscribe

तालिबानचा उपयोग भारताविरोधी कारवायांसाठी करण्याचा पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIचा डाव आहे.

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्याने संपूर्ण जग चिंतेत असतानाच पाकिस्तानमध्ये मात्र आनंदाचे वातावरण आहे. तालिबानचा उपयोग भारताविरोधी कारवायांसाठी करण्याचा पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIचा डाव आहे. ISI ने आतापर्यंत ४० ते ५० तालिबानी दहशतवाद्यांना प्रत्यक्ष नियंत्रण कक्षेवर पाठवल्याचे समोर आले असून येत्या काही दिवसात अनेक तालिबान्यांना भारतीय सीमेत घुसवण्याच्या तयारीत ISI असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर पहील्यांदाच ISIचा भारतविरोधी कट समोर आला आहे. ISIने ४०-५० तालिबानी दहशतवाद्यांना रावलाकोटहून पूंछ येथील कहूटात पोहचवल्याचं वृत्त आहे. हे सर्व दहशतवादी अफगाणिस्तानी असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

या सर्व तालिबानी दहशतवाद्यांना ISI ने सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसमधून सीमा रेषेवर आणले आहे. हे सर्व दहशतवादी जैश ए मोहम्मद मध्ये सामिल झाले असून कश्मीरमार्गे भारतात दहशतवादी कारवाया करण्याच्या तयारीत आहेत.

एकीकडे तालिबानने अफगाणिस्तान त्याच्या भूमीचा वापर भारताविरोधात करणार नाही असे आश्वासन दिले आहे. पण तालिबानचा इतिहास पाहता त्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

- Advertisement -

तज्त्रांनी व्यक्त केली ही शंका

एकीकडे जम्मू-कश्मीरमध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानी दहशतवाद्यांचा जवळजवळ बिमोड केला आहे. यामुळे तालिबानच्या वाढत्या ताकदीचा उपयोग करून कश्मीर अस्वस्थ करण्याचा पाकिस्तान प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि ISI च्या संबंधित नेत्याने एका वृत्त वाहीनीला मुलाखत दिली. त्यात तालिबान कश्मीरमध्ये आम्हांला मदत करणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -