ISIS चा प्रमुख नेता अल कुरेशी ठार; अमेरिका लष्काराला मोठं यश

२०१९ मध्ये अबू बक्र अल बगदादी ऑक्टोबरमध्ये मारला गेला होता. यावेळीही अमेरिकेने कारवाई केली होती. त्याच्या हत्येनंतर अल कुरैशी प्रमुख बनला. आता अल कुरैशी यालाही मारण्यात आलं आहे.

al kureshi

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरिया म्हणजेच आयएसआयएस (ISIS) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू हसन अल हाशिमी अल कुरेशी (Abu Hasan al-Hashimi al-Qurashi) एका युद्धात मारला गेला आहे. आयएसआयएस संघटनेच्या प्रवक्त्याने बुधवारी अल कुरेशीच्या मृत्यूची बातमी दिली. अमेरिका लष्कराने केलेल्या कारवाईत त्याचा खात्मा झाला असल्याचं समोर येत आहे.

हेही वाचा – आजपासून भारताच्या जी 20 च्या अध्यक्षपदाची सुवर्ण कारकीर्द सुरू

अल कुरेशी मारला गेला असला तरीही तो कोणत्या युद्धात मारला गेला, कोणत्या दिवशी त्याचा मृत्यू झाला, याची माहिती अद्यापही मिळालेली नाही. परंतु, अमेरिका लष्कराने दिलेल्या वृत्तानुसार, ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या युद्धात त्याचा खात्मा झाला आहे. आयएसआयएस संघटनेने जारी केलेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये आयएसआयएसच्या नव्या प्रमुख नेत्याच्या नावाचीही घोषणा करण्यात आली आहे. अल हुसैन अल हुसैनी अल कुरैशी हा नवा नेता आता आयएसआयएस या संघटनेचा प्रमुख झाला आहे.

२०१९ मध्ये अबू बक्र अल बगदादी ऑक्टोबरमध्ये मारला गेला होता. यावेळीही अमेरिकेने कारवाई केली होती. त्याच्या हत्येनंतर अल कुरैशी प्रमुख बनला. आता अल कुरैशी यालाही मारण्यात आलं आहे.

हेही वाचा – अफगाणिस्तानच्या शाळेत बाॅम्बस्फोट; १० विद्यार्थ्यांचा मृत्यू

युनायटेड स्टेट लष्कराच्या CENTCOM ने सांगितल्यानुसार, अल कुरेशी ऑक्टोबर महिन्यात मारला गेला आहे. सीरियाच्या दार प्रांतात दि फ्री सीरियन आर्मीने ही कारवाई केली होती. CENTCOM आणि आमचे सहकारी आयएसआयएसविरोधात लढण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती, CENTCOMचे प्रवक्ते कोलोनल जो बुकिनो यांनी दिली.