घरताज्या घडामोडीसीएएविरोधी आंदोलनामागे आयसीसचा हात? दोघांना अटक

सीएएविरोधी आंदोलनामागे आयसीसचा हात? दोघांना अटक

Subscribe

दिल्ली पोलिसांनी रविवारी आयसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधीत असलेल्या दाम्पत्याला अटक केली आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनामागे आयसीस या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय दिल्ली पोलिसांनी व्यक्त केला आहे. दिल्ली पोलिसांनी रविवारी आयसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधीत असलेल्या दाम्पत्याला अटक केली आहे. हे दाम्पत्य सीएएविरोधी आंदोलन भडकावत होते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

ओखलाच्या जामियानगरमधून एका दाम्पत्याला ताब्यात घेतल्याची माहिती दिल्ली पोलिस उपाध्यक्ष प्रमोद सिंह कुशवाह यांनी सांगितली. जहानजेब सामी आणि हिना बशीर बेग अशी दोघांची नावे आहेत. या दाम्पत्याचा संबंध आयसीस या संघटनेशी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.


हेही वाचा – जागतिक महिला दिन: तिच्या समलैंगिकतेवर बोलू काही

सीएए आणि एनआरसीविरोधी राजधानी दिल्लीसह देशभरात आंदोलने सुरु आहेत. राजधानी दिल्लीतील शाहीनबाग येथे जोरदार आंदेलन सुरु आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत सीएए कायद्यावरुन हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात ४८ जणांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिकजण जखमी झाले होते.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -