घरदेश-विदेशसीरियातील ISISच्या आत्मघातकी हल्ल्यात २२० ठार

सीरियातील ISISच्या आत्मघातकी हल्ल्यात २२० ठार

Subscribe

सीरियातील सुवैदा भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये २२० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आयसिस या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला आहे. यावेळी सरकारी कार्यालये आणि बाजारपेठेला लक्ष्य करण्यात आले.

आयसिस या दहशतवादी संघटनेने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये २२० जण ठार झाले आहेत. सीरियातील दक्षिण भागात आयसिसच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात येत आहे. यावेळी दहशतवाद्यांनी सरकारी कार्यालये आणि बाजारपेठेला लक्ष्य केले. सीरियातील दक्षिण भागात सुवैदा हा भाग मोडतो.य या भागातील गावांमध्ये दहशतवाद्यांनी आत्मघातकी स्फोट घडवून आणले. यावेळी सुरक्षा रक्षकांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्थान देखील घातले. हे दोघे दहशतवादी हल्ल्याच्या तयारीमध्ये होते. सीरिया सध्या अशांत असून अनेक भागांमध्ये आयसिस या दहशतवादी संघटनेने आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

यावेळी दहशतवाद्यांनी गावांमध्ये घुसून सामुहिक हत्या केली. घरामध्ये घुसून लोकांवर गोळीबार केला अशी माहिती येथील स्थानिक पत्रकाराने दिली. सुवैदा भागातील आजवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. मृतांमधील १२७ जण हे नागरिक आहेत. सध्या जखमींवर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सध्या अनेक जण बेपत्ता देखील आहेत. त्यामुळे आपल्या नातेवाईकाचा शोध घेण्यासाठी अनेकांनी रूग्णालयामध्ये धाव घेतली आहे. परिणामी रूग्णालयामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -