Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी भारतातील राजदूतासह इस्रायल दूतावासातील अधिकारी संपावर, वाचा नेमके प्रकरण काय?

भारतातील राजदूतासह इस्रायल दूतावासातील अधिकारी संपावर, वाचा नेमके प्रकरण काय?

Subscribe

इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या न्यायिक सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ संपूर्ण देश रस्त्यावर उतरला आहे. सोमवारी पुन्हा तीव्र निदर्शने देण्यात आली. तसेच, कट्टर उजव्या विचारसरणीच्या सरकारच्या निषेधार्थ भारतातील इस्रायली दूतावासही त्यांच्या सर्वात मोठ्या कामगार संघटनेने पुकारलेल्या संपात सहभागी होत आहे.

इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या न्यायिक सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ संपूर्ण देश रस्त्यावर उतरला आहे. सोमवारी पुन्हा तीव्र निदर्शने देण्यात आली. तसेच, कट्टर उजव्या विचारसरणीच्या सरकारच्या निषेधार्थ भारतातील इस्रायली दूतावासही त्यांच्या सर्वात मोठ्या कामगार संघटनेने पुकारलेल्या संपात सहभागी होत आहे. इस्रायलच्या सर्वात मोठ्या ट्रेड युनियनचे प्रमुख इसाक हरझोग यांनी ही माहिती दिली आहे. (israel embassy including ambassador go on strike)

इस्रायलच्या तेल अवीव विमानतळावर काम करणारे सर्व लोक नेतान्याहू सरकारच्या विरोधात संपावर गेले आहेत. त्यामुळे विमानांच्या टेक ऑफवर बंदी घालण्यात आली आहे. इस्रायलच्या सर्वात मोठ्या कामगार संघटनेने जगभरातील इस्रायलच्या राजनैतिक मिशनमधील कर्मचाऱ्यांसह सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना संपावर जाण्याची सूचना केली.

- Advertisement -

भारतातील इस्रायलच्या दूतावासाने सोमवारी संध्याकाळी एका निवेदनात म्हटले आहे की, “पुढील सूचना मिळेपर्यंत इस्रायलचा दूतावास आज बंद राहील. कोणतीही कॉन्सुलर सेवा दिली जाणार नाही”. दरम्यान, भारत आणि जगभरातील सर्व इस्रायली मिशनचे अधिकारी जोपर्यंत ते मागे घेत नाहीत तोपर्यंत संपावर राहणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी संरक्षण मंत्री योव गॅलांट यांची हकालपट्टी केली. योव यांनी शनिवारी टीव्हीवरील एका कार्यक्रमात सांगितले की, देशाचे न्यायालय कमकुवत करण्यासाठी आणलेल्या विधेयकामुळे लष्करातही फूट पडत आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. सरकारने विरोधकांसोबत बसून चर्चा करावी. या विधानामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले.

- Advertisement -

यानंतर इस्रायलमध्ये लाखो आंदोलक रस्त्यावर उतरले. त्यांनी नेतन्याहू यांच्याकडे वादग्रस्त विधेयक मागे घेण्याची मागणी केली. निदर्शनादरम्यान लोकांनी इस्रायलची राजधानी तेल अवीवचा मुख्य महामार्ग रोखून धरला. इस्रायलच्या लोकांनी रविवारी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या खाजगी घराबाहेर जोरदार निदर्शने केली. या लोकांशी पोलिसांची झटापट झाली.


हेही वाचा – बिल्कीस बानो प्रकरण : 11 दोषींच्या सुटकेबाबतची कागदपत्रे आवश्यक, सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस

- Advertisment -