तेल अवीव: इस्रायली लष्कर गाझा पट्टीतील हमासच्या स्थानांवर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. इस्रायली भूदलही हमासचा खात्मा करण्यासाठी कारवाया करत आहेत. दुसरीकडे गाझामध्ये हमासने ओलिस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी इस्रायलही प्रयत्न करत आहे. यासाठी इस्रायलच्या नजरा कतारवर खिळल्या आहेत. अमेरिकन सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (CIA) आणि इस्रायली एजन्सी मोसादच्या प्रमुखांनी दोहा येथे कतारच्या पंतप्रधानांची भेट घेतली. विशेष म्हणजे हमासचे राजकीय प्रमुख इस्माइल हनीयेह यांनीही कतारमध्ये आश्रय घेतला आहे. (Israel eyeing Hamas figures now living in Qatar Know Inside Story of Mossad Chief s Doha Visit)
वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, ओलीसांची सुटका करण्यासाठी आणि हमास-इस्रायल संघर्ष थांबवण्यासाठी कराराच्या मापदंडांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली. मात्र या संभाषणातून काय निष्पन्न झाले याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, इस्रायलने तात्पुरता विराम देण्यास सहमती दर्शवल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
कतार, जिथे हमास प्रमुखासह अनेक राजकीय नेते राहतात. 240 ओलिसांच्या सुटकेसाठी कतार स्वतः हमास आणि इस्रायली अधिकाऱ्यांमध्ये मध्यस्थी करत आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला. या हल्ल्यात 1400 लोक मारले गेले होते. त्याचवेळी हमासच्या सैनिकांनी शेकडो नागरिकांना बंधकही बनवले होते. तेव्हापासून इस्रायली लष्कर गाझा पट्टीतील हमासच्या ठाण्यांवर हल्ले करत आहे. या हल्ल्यांमध्ये 10 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
कतारच्या नेत्यांनी बुधवारी हमासच्या नेत्यांची भेट घेतली. यानंतर आता कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल-थानी यांनी दोहा येथे इस्रायलचे मोसाद प्रमुख डेव्हिड बारनिया आणि सीआयए संचालक विल्यम बर्न्स यांची भेट घेतली. एका अमेरिकन अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, बर्न्स यांनी हमासद्वारे ओलिसांच्या संभाव्य सुटकेवर चर्चा करण्यासाठी बर्निया आणि कतारी पंतप्रधानांची भेट घेतली. मात्र, अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. बैठकीत गाळाला इंधन पुरवठा करण्यास परवानगी देण्याबाबत चर्चा झाली. जो इस्रायलने आतापर्यंत फेटाळला होता. याचा फायदा हमासला होणार असल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी रॉयटर्सला सांगितले की गाझा युद्धात एक ते दोन दिवसांच्या युद्धविरामाच्या बदल्यात 10-15 ओलिसांच्या सुटकेवर चर्चा झाली. कतारचे शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी गुरुवारी रात्री संयुक्त अरब अमिरातीला भेट दिली, जिथे त्यांनी अबू धाबीमध्ये यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतली.
(हेही वाचा: भारताविरुद्ध तरुणांची फौज उभी करणारा ‘लष्कर’चा दहशतवादी ठार; हाफिज सईदला मोठा धक्का )