घरताज्या घडामोडीCorona: मास्कमुक्त होणाऱ्या पहिल्या इस्रायल देशात पुन्हा कोरोनाचा हाहाकार; लस घेणारे होतायत...

Corona: मास्कमुक्त होणाऱ्या पहिल्या इस्रायल देशात पुन्हा कोरोनाचा हाहाकार; लस घेणारे होतायत बाधित

Subscribe

जगभरात गेल्या दीड वर्षापासून कोरोना व्हायरसने कहर केला आहे. काही देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. जगभरात आतापर्यंत १७ कोटी ९९ लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ३८ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १६ कोटी ४६ लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान अनेक देशांनी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात इस्रालयने आऊटडोर आणि इनडोट मास्क न घालण्याची सूट दिली होती. जगातील पहिला देश होता जो मास्क मुक्त झाला होता. पण एका आठवड्यानंतर कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा इस्रायलमध्ये हाहाकार घालण्यास सुरुवात केली आहे. लस घेणारे लोकं कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचे शिकार होत आहेत.

इस्रायलने आपल्या लोकसंख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त लोकांचे लसीकरण केले आहे. यानंतर इस्रालयने सर्व निर्बंध घटवण्यासह मास्क न घालण्यास सूट दिली होती. मग एका आठवड्यानंतर इस्रायलमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचे दिसले. कोरोनाचा धोकादायक डेल्टा व्हेरियंट लस घेऊन झालेल्या लोकांमध्ये वेगाने पसरू लागला आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर किशोरवयीन मुलांचे लवकरात लवकर लसीकरण केले जावे, अशी मागणी केली जात आहे.

- Advertisement -

सोमवारी इस्रालयमध्ये १२५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. एप्रिलमध्येनंतर एका दिवसांत सर्वाधिक रुग्ण सोमवारी आढळले. जानेवारी महिन्यांत इस्रालयमध्ये कोरोनाचा कहर सुरू होता. तेव्हा इस्रालयमध्ये दिवसाला १० हजार रुग्णांची नोंद होत होती. परंतु त्यावेळेस नेतन्याहू सरकारने वेगाने लसीकरण करून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणला. पण आता सर्व निर्बंध हटवल्यामुळे रँडम चाचणी दरम्यान अनेक शाळांमध्ये बाधित प्रकरण आढळले. इस्रायल वृत्तपत्र हारेट्जच्या मते, इस्रालयच्या दोन शाळेत चाचणी दरम्यान लसीचे दोन घेणाऱ्या नऊ शिक्षक कोरोनाबाधित आढळले.

इस्रायलचे नवे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता नवीन उद्रेक होण्याचा इशारा दिला. ते म्हणाले की, ‘देशात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होत आहे. कारण परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर सक्तीने चाचणी केली जात आहे. तसेच त्यांनी आपल्या नागरिकांना परदेश दौरा कमीत कमी करण्याचा सल्ला दिला आहे.’

- Advertisement -

इस्रालयमध्ये आतापर्यंत ८ लाख ४० हजार ७९ लोक कोरोनाबाधित झाले असून यापैकी ६ हजार ४२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -