नवी दिल्ली : 7 ऑक्टोबरला हमासने युद्धाची घोषणा करत काही सेकंदाच्या आत इस्रायलवर 5 हजार क्षेपणास्त्र डागले. तेव्हापासून ते आजपर्यंत सुरू असलेल्या युद्धाने भीषण रुप घेतले आहे. हमासने युद्धाला सुरुवात केली असली तरी इस्रायल देश आता चिडीस पेटला असून त्यांनी गाझा पट्टी उद्ध्वस्त करण्याचा प्रण घेतला आहे. अशातच आता इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी सोमवारी (13 नोव्हेंबर) दावा केला की, हमासने “गाझावरील नियंत्रण गमावले आहे.” (Israel Hamas War Hamass control over Gaza is over Israeli Defense Minister Yove Gallant claims)
इस्रायलच्या मुख्य टीव्ही स्टेशनवर प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये योव गॅलंट यांनी कोणतेही पुरावे न देता दावा केला की, नागरिकांचा आता हमासवर विश्वास राहिलेला नाही. दहशतवादी दक्षिणेकडून पळ काढत आहेत. नागरिक हमासच्या ठिकाणांची लूट करत आहेत.
हेही वाचा – एका दिवाळीत खऱ्याखुऱ्या शेतकऱ्याच्या बांधावर जावे, ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींना सल्ला
गाझा जवळजवळ पूर्णपणे इस्रायली वेढ्याखाली आहे आणि अन्न, इंधन आणि इतर मूलभूत पुरवठा कमी आहे. पॅलेस्टाईनचे पंतप्रधान मोहम्मद शतायेह यांनी सोमवारी युरोपियन युनियन आणि संयुक्त राष्ट्रांना गाझामध्ये “पॅराशूट मदत” करण्याचे आवाहन केले आहे. तर हमास संचालित गाझा पट्टीचे उप-आरोग्य मंत्री युसूफ अबू रिश म्हणाले की, प्रदेशाच्या उत्तरेकडील सर्व रुग्णालये विद्युत पुरवठ्याच्या कमतरतेमुळे “सेवा प्रदान करण्यात अक्षम” आहेत. त्यामुळे गाझामधील सर्वात मोठ्या अल-शिफा रुग्णालयात अलीकडच्या काही दिवसांत सात नवजात बालके आणि 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी यूएस मीडियाला सांगितले की, गाझामधील हमासच्या ताब्यात असलेल्या ओलिसांना मुक्त करण्यासाठी एक करार केला जाऊ शकतो, परंतु त्यांनी योजना अयशस्वी होण्याच्या भीतीने तपशील देण्यास नकार दिला आहे. एका टिव्ही शो मध्ये संभाव्य कराराबद्दल नेतन्याहू यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, कदाचित असा करार असू शकतो. परंतु. गाझामधील पॅलेस्टिनी अधिकाऱ्याने नेतन्याहू यांना “अनेक कैद्यांच्या सुटकेबाबत प्राथमिक करारावर पोहोचण्यात विलंब आणि अडथळ्यासाठी दोष दिला आहे.
हेही वाचा – दिवाळीच्या मुहूर्तावर ब्रिटनच्या मंत्रिमंडळात मोठा फेरफार; माजी पंतप्रधानांना दिली ‘ही’ जबाबदारी
इस्रायलच्या ताज्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या सीमेवरून हमासच्या सैनिकांनी घुसखोरी केल्यानंतर आतापर्यंतचे सर्वात रक्तरंजित गाझा युद्ध सुरू झाले. यामुळे इस्रायलमध्ये सुमारे 1200 लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी बहुतेक नागरिक होते आणि सुमारे 240 लोकांना ओलीस ठेवण्यात आल्याचे समजते. 8 ऑक्टोबरपासून, प्रादेशिक संघर्षाच्या वाढत्या भीतीमध्ये इस्रायलने इराण समर्थित हिजबुल्लाह आणि दक्षिण लेबनॉनमधील इतर गटांवर जवळजवळ दररोज गोळीबार सुरू आहे.