घरदेश-विदेशIsrael : इस्रायली राजदूतांचे भारतीयांना आवाहन; ओलिसांसाठी आशेचा एक दिवा लावा

Israel : इस्रायली राजदूतांचे भारतीयांना आवाहन; ओलिसांसाठी आशेचा एक दिवा लावा

Subscribe

नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. असे असले तरी इस्रायलच्या ओलीस ठेवलेल्या लोकांना हमासने अद्याप सोडलेले नाही. इस्रायलचे अद्याप 240 लोक हमासच्या कैदेत असल्याचे वृत्त आहे. याचपार्श्वभूमीवर इस्रायली राजदूत नाओर गिलॉन यांनी ट्वीट करताना दिवाळीच्या दिवशी भारतातील लोकांनी इस्रायली ओलीसांसाठी आशेचा दिवा लावावा, असे आवाहन केले आहे. (Israel Hamas War Israeli ambassadors naor gilon appeal to Indians Light a beacon of hope for the hostages)

हेही वाचा – Demonetization 7 Years : 2016 ते यावर्षी 2000 रुपयांच्या नोटबंदीपर्यंतचा प्रवास

- Advertisement -

नाओर गिलॉन यांनी ट्विटरमध्ये म्हटले की, दिवाळी हा सण प्रभू रामाच्या पुनरागमनाच्या स्मरणार्थ दिवा लावून साजरा केला जातो. या प्रसंगी आपल्या जवळच्या व्यक्ती परत येण्याच्या आशेने एक दिवा लावला पाहिजे. आमच्या जवळच्या 240 जणांना एक महिन्यापासून हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले आहे. त्यामुळे या दिवाळीत आमच्या जवळच्या लोकांच्या परतीच्या आशेने दिवा लावण्याचे आवाहन करतो, असे नाओर गिलन यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

ओलीसांना बाहेर काढण्यासाठी युद्धात थोडा विराम घेण्याचा विचार करू

गाझा पट्टीतील मानवतावादी संकटाचा हवाला देत अनेक देश इस्रायलकडे हल्ला थांबवण्याची मागणी करत आहेत. मात्र इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी किंवा ओलीसांना बाहेर काढण्यासाठी युद्धात थोडा विराम घेण्याचा विचार करू, असे स्पष्टपणे सांगितले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असतानाही नेतान्याहू यांनी पुन्हा एकदा युद्धबंदीची मागणी फेटाळून लावली आहे. नेतान्याहू यांनी सोमवारी म्हटले की, लहान ब्रेक घेतले जाऊ शकतात. ‘एक तास इकडे, एक तास तिकडे, कारण आम्ही यापूर्वीही असं केलं आहे. यादरम्यान सामान्य नागरिकांना वाचवले जाऊ शकते. त्यांना सुरक्षितस्थळी हलवले जाऊ शकते, असं नेतन्याहू म्हणाले.

हेही वाचा – BIHAR CM माफी: ‘मी स्वतःचा निषेध करतो, मला खेद वाटतो’; वादग्रस्त वक्तव्यानंतर नितीशकुमारांची माफी

एक महिन्यांनंतर फक्त 4 ओलिसांची हमासकडून सुटका

इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी हमासने हल्ला केला होता. या हल्ल्यात 1400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक जखमी झाले आहेत. यादरम्यान, हमासने अनेक इस्रायली आणि परदेशी नागरिकांना ओलीस ठेवले होते. मात्र कतारच्या मध्यस्थीनंतर हमासने चार ओलिसांची सुटका केली आहे. ज्यामध्ये दोन अमेरिकन आणि दोन इस्रायली नागरिकांचा समावेश आहे. मात्र, इस्रायलकडून गाझा पट्टीवर सुरू असलेले हल्ले पाहता हमासने अजून एकाही ओलीसाची सुटका केलेली नाही. दोन्ही बाजूंनी सतत बिघडत चाललेल्या परिस्थितीमध्ये गाझामध्ये आतापर्यंत 10 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये 4000 हून अधिक मुलांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -