घरदेश-विदेशIsrael-Palestine Conflict : बॉर्डरवर तैनात असलेली महाराष्ट्रीयन कन्या शहीद

Israel-Palestine Conflict : बॉर्डरवर तैनात असलेली महाराष्ट्रीयन कन्या शहीद

Subscribe

नवी दिल्ली : इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात हमासच्या हल्ल्यात दोन भारतीय महिला सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी एक महिला महाराष्ट्रातील असल्याची माहिती मिळाली आहे. हमासकडून 7 ऑक्टोबरला इस्रायलवर करण्यात आलेल्या हल्लावेळी या दोन महिला सैनिक यांची दक्षिणी इस्रायलमध्ये तैनात होत्या.

इस्रायलमध्ये प्रत्येक नागरिकांना सैन्यात जाने बंधनकारक असते. यानुसार पुरुषांसाठी 36 महिने आमि महिलांसाठी 24 महिने सैन्यात सक्तीची सेवा असते. यात इस्रायलचे नागरिकत्व स्वीकारलेल्या परदेशी नागरिकांना देखील सक्तीची सैन्य सेवा आहे. यात भारतीय वंशाच्या दोन तरुणींनी देखील इस्रायलच्या सैन्यात सहभागी झाल्या होत्या. या दोन भारतीय महिलांना हमासने केलेल्या हल्ल्यात वीरमरण आले. या दोन शहीद झालेल्या महिलांना इस्रायल सैन्य आणि भारतीय समाजाने पुष्टी केली असून यात 22 वर्षांची लेफ्टनंट ऑर मोझेस आणि इंस्पेक्टर किम डोक्राकर यांचा समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा – इस्त्रायलसाठी हे युद्ध सोपं नाही, हमास पाठोपाठ ‘ही’ दहशतवादी संघटनाही करू शकते हल्ला

या युद्धा वीरमरण आलेली डोक्राकर ही महाराष्ट्रीयन असल्याची माहिती मिळाली असून इस्रायलच्या बॉर्डर पोलीस कार्यलयात किम डोक्राकर तैनात होती. हमासने केलेल्या हल्ल्यात इस्रायलचे बॉर्डर पोलीस कार्यलयावर त्यांनी लक्ष केले होते. या हल्ल्यात किम डोक्राकर ही शहीद झाली. आतापर्यंत हमासच्या हल्ल्यात 286 सैनिक आणि 51 पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यात भारतीय वंशाच्या मृत लोकांची संख्या वाढू शक्यता व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -