घरताज्या घडामोडीदिल्लीतल्या इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट

दिल्लीतल्या इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट

Subscribe

४-५ गाड्यांचं नुकसान, सुदैवाने कोणीही जखमी नाही

दिल्ली येथील इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट झाला आहे. या स्फोटात ४ ते ५ गाड्यांचं नुकसान झालं आहे. या घटनेत कोणीही जखमी झालेला नाही. दिल्लीची स्पेशल सेलची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. दिल्ली पोलिसांनी या स्फोटाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. फुटपाथजवळ स्फोट झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. ४ ते ५ गाड्यांच्या काचा फूटल्या आहेत. इस्त्रायली दूतावासापासून १५० मीटर अंतरावर हा स्फोट झाला. अग्निशमन विभागाची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. घटनास्थळी दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत.

- Advertisement -

दिल्लीतील जिंदल हाऊसच्या बाहेर असलेल्या झुडुपात आढळलेल्या एका पिशवीत असलेल्या IED स्फोटकांमुळे हा स्फोट झाल्याचं समजतंय. हा भाग संवेदनशील आहे. ब्राझीलचे दूतावासही जवळच आहे. त्यामुळे या भागात नेहमीच कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असते. तथापि, स्फोट झालेल्या परिसरापासून काहीच किलोमीटर अंतरावर ‘बिटिंग द रिट्रीट’ सोहळा सुरू आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा होता. स्फोटामुळे इस्रायली दूतावासाच्या बाहेर उभ्या असलेल्या अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -