घरCORONA UPDATEदेशात कोरोना फैलावासाठी तबलिगी जबाबदार असल्याचा पुरावा नाही - ISRC

देशात कोरोना फैलावासाठी तबलिगी जबाबदार असल्याचा पुरावा नाही – ISRC

Subscribe

देशात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना या फैलावासाठी दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या तबलिगींच्आ मरकज या कार्यक्रमाला दोष दिला जाऊ लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील देशभरात सापडलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी ३० टक्के रुग्ण हे तबलिगी किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्यांपैकी आहेत असं सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर देशात तबलिगींविरोधात वातावरण तयार होऊ लागलेलं असतानाच आता आयएसआरसी अर्थात इंडियन साइंटिस्ट रिस्पॉन्स टू कोविड १९ या देशभरातल्या नामांकित संस्थांमधल्या संशोधकांच्या टीमने या आरोपांना कोणताही आधार नसल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाने देखील जाहीर केलेल्या टक्केवारीला कोणतीही आकडेवारी दिली गेली नाही, असं देखील आएसआरसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मार्च महिन्यात जवळपास २३०० तबलिगींनी निजामुद्दीनमध्ये झालेल्या मरकजला उपस्थिती लावली होती. त्यावेळी परदेशातून आलेले तबलिगी देखील सहभागी झाले होते. त्यानंतर हे सर्व तबलिगी देशभरात आपापल्या राज्यात परतले. त्यांच्याच माध्यमातून कोरोना देखील देशभरात पसरल्याचे दावे केले जात आहेत. खुद्द आरोग्य मंत्रालयाने देखील देशभरातील एकूण कोरोनाग्रस्तांपैकी ३० टक्के हे तबलिगी किंवा त्यांच्या संपर्कात आलेले असल्याचं म्हटलं आहे. मात्र, या दाव्यांना कोणताही आधार नसल्याचा दावा आएसआरसीनं केलं आहे.

- Advertisement -

मरकजबद्दल सरकारला माहिती होतं!

आयएसआरसीनं म्हटलंय, ‘या साथीला धार्मिक किंवा सामाजिक भेदभावाचा रंग देण्याच्या सर्व प्रयत्नांचा आम्ही निषेध करतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननेही या रोगाला कोणत्याही धर्माला, समाजाला किंवा जातीला किंवा भागाला जोडणं चूक असल्याचं नमूद केलं आहे’. याशिवाय, आयएसआरसीने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘तबलिगी जमातने मरकज रद्द केला नाही ही तर चूक आहेच. पण राज्य सरकार आणि केंद्र सरकारने त्यांच्या पातळीवर झालेली चूक देखील मान्य करायला हवी. या कार्यक्रमाला आधीच परवानगी देण्यात आली होती. या कार्यक्रमात परदेशी नागरिक उपस्थित राहणार आहेत याची कल्पना सुरक्षा संस्थांना देखील होती. त्यांनी याला तेव्हाच विरोध का केला नाही. त्याशिवाय, सरकारने देखील नेमके किती तबलिगी आणि त्यांच्यामुळे बाधित झालेले रुग्ण आहेत याची आकडेवारी दिलेली नाही. आमचं सकरकारला आवाहन आहे की त्यांनी ही आकडेवारी जाहीर करावी’, असं आयएसआरसीनं नमूद केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -