घरदेश-विदेशइस्रोची रॉकेट प्रक्षेपणात जम्बो कामगिरी; एकाच वेळी ३६ उपग्रह अंतराळात

इस्रोची रॉकेट प्रक्षेपणात जम्बो कामगिरी; एकाच वेळी ३६ उपग्रह अंतराळात

Subscribe

श्रीहरीकोटः भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्रो)ने रविवारी सकाळी 9 वाजता रॉकेटचे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून एलव्हीएम 3-एम 3 या देशातील सर्वात मोठ्या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले. या रॉकेटच्या माध्यमातू एकाच वेळी ३६ उपग्रह अवकाशामध्ये स्थापित करण्यात आले आहेत. या कामगिरीमुळे इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. एलव्हीएम3 चे हे सहावे उड्डाण आहे. याआधी ते जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल एमके 3 (जीएसएल व्हीएमके 3) म्हणून ओळखले जात होते. चांद्रयान-2 सह या रॉकेटने सलग 5 मोहिमा केल्या होत्या, असे इस्रोने सांगितले.

ब्रिटनच्या वनवेब ग्रुप कंपनीने 72 उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोची व्यावसायिक शाखा, न्यूजस्पेस इंडिया लिमिटेडसोबत करार केला होता. करारानुसार इस्रोने याआधी 23 ऑक्टोबर 2022 रोजी 36 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत, तर रविवारी 36 उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्यात आले. इस्रोच्या या प्रक्षेपणामुळे वेब वन कंपनीच्या पृथ्वीच्या कक्षेत एकूण उपग्रहांची संख्या ६१६ होईल. त्याचवेळी, इस्रोसाठी हे या वर्षातील दुसरे प्रक्षेपण आहे. वनवेब ग्रुपची मालकी ब्रिटीश सरकार, भारताची भारती एंटरप्रायझेस, फ्रान्सची युटेलसॅट, जपानची सॉफ्टबँक, अमेरिकेची ह्यूजेस नेटवर्क्स आणि दक्षिण कोरियाची संरक्षण कंपनी हानव्हा यांच्याकडे आहे. ही सॅटेलाईट आधारित सेवा देणारी एक संपर्क कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय लंडन येथे आहे.

- Advertisement -

५,८०५ टन वजनासह उड्डाण
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेला एलव्हीएम 3-एम 3/वन वेब इंडिया-2 असे नाव देण्यात आले आहे. एलव्हीएम 3 या रॉकेटची उंची ४३.5 मीटर एवढी आहे. या रॉकेटने रविवारी 9 वाजता ३६ उपग्रहांना एकत्र घेऊन उड्डाण केले. दुसर्‍या लाँचपॅडवरून ते टेक ऑफ झाले. उड्डाण करताक्षणी त्यांचे एकूण वजन ५ हजार ८०५ टन होते.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -