घर देश-विदेश ISRO : 'चांद्रयान-3' ने इतिहास रचताना लाइव्ह स्ट्रीमिंगचा मोडला रेकॉर्ड; एवढ्या लोकांनी...

ISRO : ‘चांद्रयान-3’ ने इतिहास रचताना लाइव्ह स्ट्रीमिंगचा मोडला रेकॉर्ड; एवढ्या लोकांनी पाहिले यशस्वी लँडिंग

Subscribe

ISRO : भारताच्या (India) ‘चांद्रयान-3’ (Chandrayaan-3) ने बुधवारी चंद्रावर यशस्वी लँडिंग केले आणि भारताने इतिहास रचला. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरला आहे. विशेष म्हणजे इस्रोच्या (ISRO) यूट्यूबवरील (YouTube) लाइव्ह स्ट्रीमिंग लिंकनेही (Live streaming Link) इतिहास रचला आहे. ‘चांद्रयान-3’ च्या यशस्वी लँडिंगचे लाईव्ह स्ट्रीमिंग एकाच वेळी 8.06 दशलक्ष लोकांनी पाहिले आणि यूट्यूब इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. (ISRO Chandrayaan 3 breaks live streaming record while making history So many people saw the successful landing)

आतापर्यंत यूट्यूबवर ब्राझील वि. कोरियाच्या फुटबॉल सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग 6.15 दशलक्ष लोकांनी एकाच वेळी पाहिले होते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील विरुद्ध क्रोएशिया फुटबॉल सामना एकाच वेळी 5.2 दशलक्ष लोकांनी पाहिला होता. मात्र या दोन्ही लाइव्ह स्ट्रीमिंगला ‘चांद्रयान-3’ च्या लाइव्ह स्ट्रीमिंगने मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Chandrayan-3 : असा होता चांद्रयान-3 मोहिमेचा प्रवास; वाचा-कधी काय घडले?

यूट्यूबवर आतापर्यंत सर्वाधिक पाहिलेले लाइव्ह स्ट्रीमिंग

इस्रो ‘चांद्रयान -3’ – 8.06 दशलक्ष
ब्राझील विरुद्ध दक्षिण कोरिया – 6.15 दशलक्ष
ब्राझील विरुद्ध क्रोएशिया – 5.2 मी
वास्को विरुद्ध फ्लेमेन्गो – 4.8 मी
SpaceX क्रू डेमो – 4.08m
BTS बटर – 3.75M
सफरचंद – 3.69 मी
जॉनी डेप विरुद्ध अंबर – 3.55 दशलक्ष
फ्लुमिनेन्स विरुद्ध फ्लेमेन्गो – 3.53M
कॅरिओका चॅम्पियन अंतिम सामना – 3.25 मी

- Advertisement -

हेही वाचा – Chandrayaan-3 Mission: इतिहास रचल्यानंतर चांद्रयान कसे कार्य करेल? जाणून घ्या सविस्तर

इस्रोचे एका तासात 9 लाख सदस्य वाढले

इस्रोच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर ‘चांद्रयान-3’ च्या लँडिंगपूर्वी सदस्यांची संख्या 2.68 दशलक्ष म्हणजे सुमारे 26 लाख  इतकी होती. मात्र ‘चांद्रयान-3’ च्या यशस्वी लँडिंगनंतर सदस्य संख्या आता 35 लाख झाली आहे. ‘चांद्रयान-3’ च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण 1 तास 11 मिनिटे चालले आणि या एका तासात इस्रोचे तब्बल नऊ लाख सदस्य वाढले आहेत. इस्रोचे लाइव्ह स्ट्रीमिंग एकाच वेळी पाहणाऱ्याची संख्या सदस्यांच्या संख्येपेक्षा तिप्पट होती.

9 मिनिटांत 2.9 दशलक्ष लोक ‘चांद्रयान-3’ चे लँडिंग पाहण्यासाठी सामील झाले

इस्रोच्या यूट्यूब चॅनेलचे 2.68 दशलक्ष सदस्य आहेत. परंतु काल ‘चांद्रयान-3’ चे लँडिंग पाहण्यासाठी इस्रोच्या चॅनेलमध्ये केवळ 9 मिनिटांत 2.9 दशलक्ष लोक सामील झाले आणि ही संख्या पुढे वाढतच गेली. 13 व्या मिनिटाला 3.3 दशलक्ष,
17 व्या मिनिटाला 40 लाख, 31 मिनिटांनंतर 5.3 दशलक्ष म्हणजेच 53 लाख, 45 मिनिटांनंतर 6.6 दशलक्ष आणि त्यानंतर काही मिनिटांतच प्रेक्षकांची संख्या 80 लाखांवर पोहोचली होती.

- Advertisment -