Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश 'इंडिया ऑन द मून' चंद्रावर पाऊल ठेवताच ISRO प्रमुखांनी दिली पंतप्रधानांना माहिती

‘इंडिया ऑन द मून’ चंद्रावर पाऊल ठेवताच ISRO प्रमुखांनी दिली पंतप्रधानांना माहिती

Subscribe

भारताच्या इतिहासात आज एका अत्यंत आनंदाच्या आणि गौरवाचा क्षणाची नोंद झाली. भारताच्या इस्त्रोने पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरले.

नवी दिल्ली : चांद्रयान ३ नं चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानं भारतासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक ठरला आहे. या ऐतिहासिक क्षणाची माहिती इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोनवरुन दिली. “भारत चंद्रावर पोहोचला” अशा मोजक्याच शब्दांत त्यांनी मोदींना आपण यशस्वी ठरल्याचे सांगितले. हिंदीत एका म्हणीचा उल्लेख करत त्यांनी चंदामामा दुर के नाही तर चंदामामा घरके असे म्हणत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. (ISRO chief informs PM as soon as ‘India on the moon’ steps on the moon)

भारताच्या इतिहासात आज एका अत्यंत आनंदाच्या आणि गौरवाचा क्षणाची नोंद झाली. भारताच्या इस्त्रोने पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरले. चंद्रयात-3 हे यान चंद्राच्या दक्षिण धृवावर यशस्वीपणे उतरले आणि भारताचा तिरंगा ध्वज चंद्रावर फडकला. महत्वाचे म्हणजे चंद्राच्या दक्षिण धृवावर पाय ठेवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले इस्रो प्रमुख

चांद्रयान-3 च्या यशस्वीतेनंतर प्रतिक्रिया देना एस.सोमनाथ
म्हणाले की, लँडर मोड्यूल सुरक्षितपणे चंद्रावर लॅंड झाले आहे. ही आपल्या साठी गर्वाची गोष्ट आहे. हिंदीत एक म्हण आहे, चंदा मामा दूर के, मात्र आता आपण म्हणून शकतो, चंदामामा अपने घर के, असे म्हणत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा : चंद्र आला कवेत; भारताच्या चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लॅंडिंग

सहकाऱ्यांचे केले अभिनंदन

इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाबद्दल त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. समर्थनाबद्दल सर्वांचे आभार…आम्ही आमच्या अपयशातून खूप काही शिकलो आणि आज आम्ही यशस्वी झालो आहोत. आम्ही आतापासून पुढील 14 दिवस चांद्रयान-3 ची वाट पाहत आहोत.

हेही वाचा : भारतासाठी अविस्मरणीय क्षण – पंतप्रधान नरेंद्र मोदी

सिवन यांनीही केले अभिनंदन

इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांनी चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल इस्रोच्या तिसर्‍या चंद्र मोहिमेचे चंद्रयान-3 चे अभिनंदन केले. आम्‍ही खरोखर उत्‍साहित झालो आहोत. आम्ही या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहत आहोत. मी खूप आनंदी आहे आहे असे म्हणत त्यांनीही त्यांचा आनंद व्यक्त केला.

- Advertisment -