घरदेश-विदेशइस्रोचे SSLV-D2 रॉकेट श्रीहरिकोटातून लाँच; 3 उपग्रहांसह अवकाशात करणार प्रवेश

इस्रोचे SSLV-D2 रॉकेट श्रीहरिकोटातून लाँच; 3 उपग्रहांसह अवकाशात करणार प्रवेश

Subscribe

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO ने त्यांचा नवीन आणि सर्वात लहान उपग्रह प्रक्षेपण वाहन SSLV-D2 लाँच केलं आहे. श्रीहरिकोटामधील सतीश धवन लाँच सेंटरमधून या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे. SSLV-D2 हे EOS-07, Janus-1 आणि AzaadiSat-2 या तीन पेलोडसह प्रक्षेपित झालं आहे. SSLV-D2 चे एकूण वजन 175.2 किलो आहे. हा उपग्रह 10 किलो ते 500 किलोपर्यंतचे वजन वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आलं आहे.

SSLV-D2 हा उपग्रह 15 मिनिटांपर्यंत पृथ्वीच्या खालील कक्षेत उड्डाण करेल. याठिकाणी या उपग्रहांना 450 किमी वर्तुळाकार कक्षेत तैनात केलं जाईल. SSLV चा उद्देश लहान उपग्रह प्रक्षेपित करणं आहे. यासोबत पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकलचा वापर आत्तापर्यंत प्रक्षेपणाच मोठ्या प्रमाणात केला जातो. SSLV मुळे ते आता मोठ्या मोहिमांसाठी फ्री राहील. SSLV हे 500 किमी अंतरावरील प्लॅनर ऑर्बिटमध्ये 10 ते 500 किलो वजनाची वस्तू वाहून नेऊ शकते.

- Advertisement -

SSLV-D2 उपग्रहासोबत Janus-1 हे पेलोड्स आहे. हे एक टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेटर आहे. तर आझादी सॅट 2 हे एक स्मार्ट सॅटेलाईट मिशन आहे. हे लॉरा आणि रेडिओ संप्रेषण क्षमता प्रदर्शित करणार आहे. हे भारतातील 75 शाळांमधील 750 विद्यार्थ्यांनी तयार केलं आहे.

ऑगस्ट 2022 मध्ये SSLV-D2 ची पहिली मोहीम अयशस्वी झाली. त्यानंतर वाहनात अनेक बदल करण्यात आले. हे लहान उपग्रह प्रक्षेपण मार्केटच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 10 फेब्रुवारीचा मुंबई दौरा नेमका कसा असेल? जाणून घ्या वेळापत्रक 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -