घरदेश-विदेशइस्त्रोने केले सर्वात जास्त वजनदार उपग्रहाचे प्रक्षेपण

इस्त्रोने केले सर्वात जास्त वजनदार उपग्रहाचे प्रक्षेपण

Subscribe

इस्त्रोने आतापर्यंत प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांपेक्षा सर्वात जास्त वजनदार उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. या उपग्रहाच नाव GSAT-29 असे आहे.

इस्त्रोने GSAT-29 या उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. विशेष म्हणजे हा उपग्रह आतापर्यंत प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांपेक्षा सर्वात जास्त वजनदार आहे. या उपग्रहाचे वजन तब्बल ३४२३ कि.ग्रॅ. इतके आहे. या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी जगातील सर्वात मोठा बुस्टर प्रज्वलीत करण्यात आला होता. त्या बूस्टरचे नाव S2OO असे आहे. आज श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून इस्त्रोने उपग्रहाचे प्रक्षेपण केले. हा उपग्रह GSLV-MK-III D2 या प्रक्षेपक यानाद्वारे आवकाशात पाठवण्यात आले. इस्त्रो आता पुढील चार वर्षांत असेच दोन उपग्रह आकाशात पाठवणार आहे.

हेही वाचा – इस्रोची अभिमानस्पद कामगिरी

- Advertisement -


हेही वाचा – कॅबिनेटकडून इस्त्रोला १०,९०० कोटींचे आर्थिक पाठबळ

‘हा’ असणार उपग्रहाचा फायदा

या उपग्रहाचा फायदा दळणवळण क्षेत्रासाठी होणार आहे. विशेषत: जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातल्या दळणवळण क्षेत्राचा विकास करण्यासाठी या उपग्रहाचा फायदा होणार आहे. इस्त्रोचा हा उपग्रह पुढील दहा वर्षांसाठी काम करणार आहे. इस्त्रो अशाच प्रकारचे दोन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. यामधील GSAT-11 डिसेंबरमध्ये तर GSAT-20 हा उपग्रह पुढच्या वर्षी प्रक्षेपित होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – २०२२ पर्यंत गगनयान अंतराळात झेपावणार !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -