घरताज्या घडामोडीइस्रोचे कौतुक! एकाच वेळी अवकाशात सोडले 9 उपग्रह

इस्रोचे कौतुक! एकाच वेळी अवकाशात सोडले 9 उपग्रह

Subscribe

इस्रोने आज सकाळी 12 वाजताच्या सुमारास श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅडवरून OceanSat-3 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. इस्रोने एकाच वेळी अवकाशात 9 उपग्रह सोडले. त्यामुळे इस्रोच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. PSLV-XL रॉकेटने या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. यासोबतच भूतानसाठी विशेष रिमोट सेन्सिंग उपग्रहासह 8 नॅनो उपग्रहही प्रक्षेपित करण्यात आले. भुतानसाठी पाठविण्यात आलेला उपग्रह भूतानसॅट हा भारत-भूतानचा संयुक्त उपग्रह आहे. हा नॅनो उपग्रह आहे.

डेटा रिसेप्शन भूतानमध्ये भारताच्या सहकार्याने तयार केलेल्या केंद्रात होईल. OceanSat-3 समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान, क्लोरोफिल, फायटोप्लँक्टन, एरोसोल आणि प्रदूषण यांचेही परीक्षण करेल. हा 1000 किलो वजनाचा उपग्रह आहे. Oceansat-1 प्रथम 1999 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले. यानंतर 2009 मध्ये त्याचा दुसरा उपग्रह अवकाशात स्थापित करण्यात आला.

- Advertisement -

Oceansat-3 लाँच करण्याऐवजी SCATSAT-1 पाठवण्यात आला. कारण Oceansat-2 निरुपयोगी झाले होते. आनंद हा खासगी कंपनी पिक्सेलचा उपग्रह आहे. अ‍ॅस्ट्रोकास्ट हा दुर्गम भागाला जोडणारा उपग्रह आहे. उपग्रह IoT सेवेसाठी हे एक लहान, परवडणारे तंत्रज्ञान आहे.


हेही वाचा : जमिनीत भूयार करून रेल्वेच्या इंजीनाची चोरी; तिघांना अटक

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -