श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून स्पॅडेक्स मिशन अंतर्गत सोमवारी (30 डिसेंबर) भारतीय वेळेनुसार रात्री 9.58 वाजता 2 उपग्रह यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले. पीएसएलव्ही-सी 60 द्वारे हे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले. स्पॅडेक्स मिशन यशस्वी झाल्यानंतर भारत आता अमेरिका, रशिया आणि चीनसारख्या जगातील निवडक देशांच्या रांगेत जाऊन बसला आहे. (Isro’s PSLV-C60 launched with SpaDeX satellites to space)
हेही वाचा : Vijay Wadettiwar : बुद्धी गमावलेल्या महायुतीच्या मंत्र्यांकडून…मिनी पाकिस्तान मुद्द्यावरून वडेट्टीवार भडकले
स्पॅडेक्स ही इस्रोची 2024 मधील शेवटची मोहीम होती. स्पॅडेक्स मोहिमेचा उद्देश अवकाशयानांना डॉक (एका यानाला दुसर्या यानाशी जोडणे) आणि अनडॉक (अंतराळात जोडलेले दोन यान वेगळे करणे) करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करणे हा आहे. स्पॅडेक्स मिशनमध्ये 2 लहान अंतराळ यानांचा समावेश आहे. प्रत्येक यानाचे वजन अंदाजे 220 किलो आहे. पृथ्वीपासून 470 किलोमीटर अंतरावरील कक्षेत म्हणजे पृथ्वीच्या खालच्या कक्षेत हा प्रयोग केला गेला. यामध्ये एक चेझर (एसडीएक्स 01) नावाचा उपग्रह आहे आणि दुसरा टार्गेट (एसडीएस 02) नावाचा उपग्रह आहे.
🎉 SpaDeX Deployed! 🛰️
Successful separation of SpaDeX satellites marks another milestone in India’s space journey.
🎥 Watch live: https://t.co/D1T5YDD2OT
📖 More info: https://t.co/jQEnGi3W2d#ISRO #SpaDeX 🚀
— ISRO (@isro) December 30, 2024
डॉकिंग प्रक्रियेची गरज काय?
इस्रोच्या मते, जेव्हा अवकाशात अनेक वस्तू असतात आणि त्यांना एकत्र आणणे आवश्यक असते तेव्हा डॉकिंग केले जाते. डॉकिंग ही अशी प्रक्रिया आहे, ज्याच्या मदतीने दोन अवकाशीय वस्तू एकत्र येतात आणि जोडतात. डॉकिंगच्या अनेक पद्धती आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर क्रू डॉक हवेतील दबाव समान करून क्रू सदस्यांचे हस्तांतरण करते.
या मोहिमेचे फायदे…
स्पॅडेक्स ही मोहीम यशस्वी झाली तर यामुळे भारताला स्वतःचे अंतराळ स्थानक आणि चांद्रयान-4 सारखी मानवी अंतराळ उड्डाणे स्थापन करण्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. या स्थानकांमुळे उपग्रह दुरुस्ती, इंधन भरणे इतर प्रयोगांसाठी बेस तयार करणार आहे.