Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग Good News! या वर्षात 'Cognizant' IT कंपनी देणार १ लाखाहून अधिकांना रोजगार

Good News! या वर्षात ‘Cognizant’ IT कंपनी देणार १ लाखाहून अधिकांना रोजगार

Related Story

- Advertisement -

तुम्ही बेरोजगार आहात? तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नावाजलेली आयटी कंपनी कॉग्निझंट यावर्षी एक लाख लोकांना नोकरी देणार आहे. जगातील आघाडीची आयटी कंपनी कॉग्निझंट (cognizant) नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे त्रस्त आहे आणि याचा परिणाम कंपनीच्या कामकाजावर होत असल्याचे सांगितले जात आहे. आता या समस्येचे निराकरण करण्यासाठी कॉग्निझंट कंपनीने २०२१ मध्ये १ लाखाहून अधिक अनुभवी लोकांना रोजगार देण्याची योजना आखली आहे. याशिवाय, कंपनी १ लाखांहून अधिक एसोसिएट्सना प्रशिक्षित करण्याची तयारी देखील करत आहे. दरम्यान, जूनच्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न ४१.८ टक्क्यांनी वाढून ५१.२ कोटी म्हणजेच साधारण ३ हजार ८०१ कोटी झाले आहे. अशी माहिती कंपनीने बुधवारी दिली आहे. जून २०२० च्या तिमाहीत अमेरिकेत असणाऱ्या कंपनीने एकूण ३६.१ कोटी डॉलर्सचे उत्पन्न कमावले आहे.

कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, यावर्षी साधारण ३० हजार नवीन पदवीधरांना संधी देणार आहे. त्याचबरोबर कंपनी २०२२ साठी, भारतात ४५ हजार फ्रेशर्सना नोकरी देण्याची योजना बनवत आहे. कंपनीने हे निवेदन अशावेळी जारी केले ज्यावेळी अट्रेशन रेट म्हणजेच नोकरी सोडणार्‍या लोकांची संख्या वाढती आहे. जून तिमाहीच्या शेवटी कंपनीत साधारण ३ लाखाहून अधिक कर्मचारी होते. दरम्यान, Cognizant च्या CEO ब्रायन हम्फ्रीज यांनी असे सांगितले की, अ‍ॅट्रेशन रेट कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. यात compensation adjustments, job rotations, reskilling आणि promotions यासारख्या क्रियांचा समावेश आहे.

- Advertisement -

कॉग्निझंटने वित्त वर्ष २०२१ साठीच्या उत्पन्नच्या वाढीचे लक्ष्य १०.२-११.२ टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहे. मागील तिमाहीत कंपनीचा महसूल १४.६ टक्क्यांनी वाढून ४.६ अब्ज डॉलर झाला आहे, जो मागील वर्षातील याच कालावधीत ४ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका असून कंपनीच्या अंदाजापेक्षा हा आकडा सर्वाधिक असल्याचे सांगितले जात आहे.


प्लेनमध्ये JRD Tata जेव्हा स्वतःच टॉयलेट पेपर बदलतात, अनुभवानंतर बोइंग विमानांची तपासणी

 

- Advertisement -

 

- Advertisement -