बंगळुरू : येथील आयआयएमच्या एका विद्यार्थ्याचा वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. अशातच आता आणखी एका आयटी अभियंत्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अभियंत्याने आणि त्याच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलांना विष दिले. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. (IT engineer in Bengaluru poisoned children before committing suicide)
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी आयटी अभियंत्याच्या घरात काम करणारी मोलकरीण आली आणि दरवाजाची बेल वाजवली. मात्र बराच वेळ दरवाजा ठोठावूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तिने शेजाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता त्यांना आयटी अभियंता, त्याची पत्नी आणि त्यांची दोन्ही मुले मृतावस्थेत आढळून आली. 38 वर्षीय अनुप कुमार, त्यांची 35 वर्षीय पत्नी राखी आणि 5 वर्षांची मुलगी आणि 2 वर्षाचा मुलगा हे सर्वजण मूळचे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी होते.
हेही वाचा – Mukesh Chandrakar : क्रूरतेचा कळस; ठार मारण्यापूर्वी मुकेश चंद्राकारचे केले हाल; शवविच्छेदन अहवाल काय सांगतो
बंगळुरू शहराचे डीसीपी शेखर एच टेकन्नवर यांनी सांगितले की, अनुप कुमार हा एका खाजगी कंपनीत सॉफ्टवेअर सल्लागार होता आणि तो आपल्या कुटुंबासह आरएमव्ही स्टेज 2 मध्ये भाड्याच्या घरात राहत होता. या प्रकरणाची माहिती मिळताच सदाशिवनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह बाहेर काढला. मात्र त्यांचा मृत्यू कसा झाला याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासानंतर अनुप आणि राखी यांनी गळफास घेण्यापूर्वी मुलांना विष पाजल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी त्यांच्या मोलकरणीकडे चौकशी केली तिने सांगितले की, मृत दाम्पत्य त्यांच्या मोठ्या मुलीच्या प्रकृतीच्या समस्येमुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते. कारण त्यांची मुलगी अनुप्रिया ही अपंग होती. हे कुटुंब पुद्दुचेरीला जायचे ठरवत होते. त्यासाठी त्यांनी पॅकिंग केले होते, अशी माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांना घरातून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. त्यामुळे चौघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण समोर येईल.
हेही वाचा – Pune Crime : पाहुणा बनून आला अन् 2 मुलांवर केले अत्याचार; आळंदीतील खासगी संस्थेतील धक्कादायक प्रकार