घरदेश-विदेश1000 लोकांची साथ मिळणे ही सन्मानाची बाब; काँग्रेस अध्यक्षपदाच्या निकालावर शशी थरूर...

1000 लोकांची साथ मिळणे ही सन्मानाची बाब; काँग्रेस अध्यक्षपदाच्या निकालावर शशी थरूर यांची प्रतिक्रिया

Subscribe

या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल मी मल्लिकार्जुन खरगे यांचे अभिनंदन करतो." असं शशी थरूर म्हणाले.

काँग्रेस अध्यक्षपदासाठीची निवडणूक (congress president election) मागील काही दिवसांपासून चर्चेत होती. काँग्रेसच्या अध्यक्ष पदी कोण बसणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शाश्री थरूर यांच्यात चुरस होती. दरम्यान काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर (shashi tharoor) यांनी बुधवारी आपला पराभव स्वीकारला आणि त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांचे अभिनंदन केले. शशी थरूर यांचा या निवडणुकीत पराभव झाला असला तरीही त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेने थरूर यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दरम्यान आपला प्रभाव स्वीकारत शशी थरूर म्हणाले, ”1000 साथीदार एकत्र असणे हा देखील एक प्रकारचा सन्मानच असलयाचे शशी थरूर म्हणाले. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. निवडणुकीच्या निकालानुसार मल्लिकार्जुन खर्गे यांना 7,897 तर शशी थरूर यांना 1,072 मतं मिळाली. दरम्यान एका निवेदनात शशी थरूर म्हणाले की, “निवडणुकीचा अंतिम निकाल खर्गे यांच्या बाजूने लागला, काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या विजया झाला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो”. “काँग्रेसचे अध्यक्ष होणे ही अत्यंत सन्मानाची, मोठी जबाबदारी आहे, या निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल मी मल्लिकार्जुन खरगे यांचे अभिनंदन करतो.” असं शशी थरूर म्हणाले.

- Advertisement -

पुढे बोलताना शशी थरूर म्हणाले, “काँग्रेस अध्यक्षपदासाठी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुक घेण्यात आली. त्यात योगदान दिल्याबद्दल मी राहुल गांधी (rahul gandhi) आणि प्रियंका गांधी (priyanaka gandhi)यांचे आभार मानतो. काँग्रेसचे सुमारे 9900 प्रतिनिधी पक्षप्रमुख निवडण्यासाठी मतदान करण्यास पात्र होते. काँग्रेस मुख्यालयासह सुमारे 68 मतदान केंद्रांवर मतदान झाले. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि इतर अनेक वरिष्ठ नेत्यांसह सुमारे 9500 प्रतिनिधींनी सोमवारी काँग्रेस पक्षाच्या नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी मतदान केले.


हे ही वाचा –  पावसाच्या परतीला दिवाळीचा मुहूर्त; गुरवारी होणार आकाश मोकळे

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -