‘…त्याला राजकारणात उद्धव मार्ग म्हणतात’; चित्रा वाघ यांच्या प्रतिक्रियेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

उद्धव ठाकरे(uddhav thackeray) यांचे नाव घेत चित्रा वाघ यांनी नितीश कुमार(nitish kumar) यांना प्रतिक्रिया देत डिवचले आणि आता त्यामुळेच नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Chitra Wagh

शिवसेनेसोबत (shivsena) बंडखोरी केल्या नंतर एकनाथ शिंदे(eknath shinde) यांनी भाजपसोबत(bjp) हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात(maharshtra politics) मोठ्या प्रमाणावर राजकीय गदारोळ झाला. दरम्यान एकीकडे भाजपने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली तर दुसरीकडे बिहार(bihar politics) मध्ये भाजपला धक्का बसला आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजप सोबत काडीमोड घेत लालूप्रसाद यादव आणि काँग्रेस सोबत हातमिळवणी करत बिहार मध्ये सत्ता स्थापन करत असल्याचा दावा केला आणि बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी शपथ घेतली, तर तेजस्वी यादव यांनी बिहाचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

यावर देशभरातून प्रतिक्रिया देत आहेत. अशातच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा प्रतिक्रया दिली आहे. उद्धव ठाकरे(uddhav thackeray) यांचे नाव घेत चित्रा वाघ यांनी नितीश कुमार(nitish kumar) यांना प्रतिक्रिया देत डिवचले आणि आता त्यामुळेच नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Bihar Nitish Kumar swears in as Chief Minister for 8th timeTejashwi Yadav to be Deputy Chief Minister

हे ही वाचा – भाजपने मित्र पक्षांना धोका दिला नाही; बिहार राजकारणावरून फडणवीसांनी शिवसेनेवर साधला निशाणा

मागील बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळाल्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. त्याचप्रमाणे भाजपला(bjp) बाजूला करत आरजेडी सोबत हातमिळवणी करत बिहार मध्ये सत्त्तांतर केले. या सगळ्या प्रकारावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यावेळी चित्रा वाघ(chitra wagh) म्हणाल्या, ‘नितीश कुमार ज्या मार्गावर चालले आहेत, त्या मार्गाला राजकारणात उद्धव मार्ग म्हणतात’. असं सूचक ट्विट करत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत शिवसेनेला सुद्धा खोचक टोला लगावला आहे. बिहारच्या राजकीय परिस्थितीवर ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी शिवसेनेला(shivsena) डिवचल्याने राज्यात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना असा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा – नितीश कुमार यांनी आठव्यांदा घेतली बिहार मुख्यमंत्री पदाची शपथ

chitra wagh criticized on cm uddhav thackeray
दरम्यान या सगळ्यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत(arvind sawant) यांनी सुद्धा टीका केली आहे. ‘भाजपने इंग्रजांची निती धरली आहे. ते ज्या शिडीवरून चढतात त्याच शिडीला ते लाथ मारतात. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात शिवसेनेला त्रास देणे सुरु होते त्याप्रमाणे बिहार मध्ये नितीश कुमार यांना त्रास देणे सुरु होते. त्यामुळेच नितीश कुमार यांच्या एका मंत्र्याने राजीनामा सुद्धा दिला. पण महाराष्ट्रात जी परिस्थिती झाली त्यावरून नितीश कुमार शहाणे झाले. भाजपचा कट त्यांच्या लक्षात आला आणि नितीश कुमार(nitish kumar) यांनी भाजपचा डाव उधळून लावला’. भाजपवर बोचरी टीका करत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा – उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेनेत द्वंद्व, म्हणून सेना फुटली; आशिष शेलारांची टीका