घरदेश-विदेशसर्वांना बरोबर घेऊन चालण्याची काँग्रेसचीच भूमिका, पक्ष स्थापनादिनी खर्गेंचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची काँग्रेसचीच भूमिका, पक्ष स्थापनादिनी खर्गेंचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेसने दलित आणि गरिबांच्या बेड्या तोडल्यानेच भारताची प्रगती झाली आहे. लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या मंत्रिमंडळात 5 बिगर-काँग्रेसी मंत्र्यांची नियुक्ती केली होती. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची काँग्रेसची भूमिका त्यातून दिसून येते, असे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जन खर्गे यांनी केले.

- Advertisement -

देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसचा आज, बुधवारी 138वा स्थापना दिवस आहे. स्वातंत्र्यचळवळीदरम्यान 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईत काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. यानिमित्ताने देशाच्या विविध भागात काँग्रेसतर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. एका कार्यक्रमासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे मुंबईत येणार आहेत. दिल्लीतील पक्ष मुख्यालयातही एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय काँग्रेसचे मुख्यालय आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मुख्यालयात पोहोचल्यानंतर ध्वजारोहण केले. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. काँग्रेस पक्ष सर्वसमावेशक करण्यासाठी तरुण, महिला, उपेक्षित घटक आणि विचारवंतांना आपल्यासोबत सामावून घेतले पाहिजे, असे सांगून खर्गे म्हणाले की, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने देशभरातील कोट्यवधी कार्यकर्त्यांना संजीवनी मिळाली आहे.

- Advertisement -

टी-शर्ट ही चल रही है…
खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा 7 सप्टेंबरपासून सुरू झाली. कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप श्रीनगरला होणार आहे. सध्या ही यात्रा राजधानी दिल्लीत आहे. राहुल गांधी यांनी आतापर्यंतच्या यात्रेत टी-शर्ट परिधान केला आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी ते काँग्रेस मुख्यालयात आज टी-शर्ट घालूनच गेले होते. दिल्लीत कडाक्याची थंडी असतानाही त्यांना टी-शर्टमध्ये आलेले पाहून पत्रकारांनी त्याबद्दल विचारणा केली. त्यावर राहुल गांधी म्हणाले, टी-शर्ट ही चल रही है. जब टी शर्ट नहीं काम करेगी, तब देखेंगे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -