Maharashtra Assembly Election 2024
घरताज्या घडामोडीRamlila Maidan : एक व्यक्ती-एक पक्षाचे सरकार घालवण्याची वेळ आली; रामलीला मैदानावरुन...

Ramlila Maidan : एक व्यक्ती-एक पक्षाचे सरकार घालवण्याची वेळ आली; रामलीला मैदानावरुन उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

Subscribe

INDIA alliance Rally Uddhav Thackeray At Ramlila Maidan नवी दिल्ली – भाजपचे सहकारी पक्ष हे ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय आहे. आता त्यांचे (भाजपचे) स्वप्न चारशे पार बहुमत मिळवायचे आहे. मात्र आपल्याला अब की बार भाजप तडीपार ही भूमिका घेऊन काम करावे लागले, असे आवाहन शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या रामलीला मैदानावरील महारॅलीमध्ये केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, एक व्यक्ती आणि एका पक्षाचे सरकार देशासाठी धोकादायक झाले आहे. एक व्यक्ती आणि एक पक्षाचे सरकार घालवण्याची वेळ आली आहे. इंडिया आघाडीच्या मंचावरुन उद्धव ठाकरेंनी जनतेला आवाहन केले की, यांना घालवून आम्हाला सशक्त आणि मजबूत देश निर्माण करायचा आहे. त्यासाठी आपल्याला आघाडी सरकारला सत्तेत आणावेच लागेल, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, देशात विविध राज्य, प्रांत आणि प्रदेश आहेत. त्यांच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणारे सरकार आम्हाला पाहिजे आहे. या देशातील राज्य विविधतेने नटलेले आहेत. त्या राज्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहिले तरच देश वाचणार आहे. नाही तर मग जनतेने ठरवायचे आहे की, त्यांना त्यांचे भविष्य कोणाच्या हातात द्यायचे आहे, असा इशारा त्यांनी दिला.

- Advertisement -

अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना उचललं आणि तुरुंगात डांबलं आहे. ही कोणती शासनप्रणाली आहे, असा सवाल करत उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांच्या ज्यांच्यावर स्वतः भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यांना भाजपने त्यांच्या वॉशिंग मशिनमध्ये टाकले ते स्वच्छ झाल्याचे सांगत त्यांना आपल्यासोबत मंचावर विराजमान करुन घेतले आहे. हे भ्रष्टाचारी लोक देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणार आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

- Advertisement -

भाजपकडे सर्व भ्रष्टाचारी, जुमलेबाज

भारतीय जनता पक्षाने इंडिया आघीडीच्या सभेला ठगों का मेला म्हटले, त्याचाही समाचार उद्धव ठाकरेंनी घेतला. ते म्हणाले की, इथे जमलाले तमाम लोक काय ठग आहेत का? जे देशप्रेमी आहेत, ते ठग आहेत का? जे जे भ्रष्टाचारी आहेत ते आता भाजपमध्ये आहेत. तिकडे सर्व जुमलेबाज लोक आहेत, असे सांगत मोदी-शहांना नाव न घेता टोला लगावला.

अब की बार भाजप तडीपार

शेतकऱ्याला अन्नदाता म्हणणारा आपला देश आहे. काही महिन्यांपूर्वी पंजाब उत्तर भारतातील शेतकरी दिल्लीच्या दिशेने येत होते तर त्यांच्या मार्गात खिळे टाकण्यात आले. अश्रूधुराच्या नळकांड्या त्यांच्यावर फोडण्यात आल्या. रबर बुलेट्सचा मारा करत त्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यात आले. शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाऱ्या भाजपला आता दिल्लीच्या सत्तेवर येण्यापासून रोखण्याचे काम देशभरातील शेतकऱ्यांना करावे लागणार आहे, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.

इंडिया आघाडीच्या मुंबईतील शिवाजी पार्क येथील सभेत दिलेल्या घोषणेचा पुनरुच्चाचर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावरही केला. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना दिल्लीला येण्यापासून ज्या पद्धतीने भाजप सरकारने रोखले तसेच आता शेतकऱ्यांनी भाजपला दिल्लीच्या सत्तेत येण्यापासून रोखण्याचे काम करायचे आहे. इथून घरी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या गावात, खेड्यात, घराघरात घोषणा द्यायची आहे की अब की बार भाजप तडीपार.

अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्यासोबत शिवसेना (ठाकरे गट) पक्ष असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : INDIA Rally : इंडियाच्या महासभेत महिला आघाडीवर; सुनिता केजरीवाल, कल्पना सोरेन सांगणार पतीचा संदेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -