घरदेश-विदेशIT Raid On Dhiraj Sahu : साहू यांच्याकडील रोकड मोजण्यासाठी मागवली मशीन...

IT Raid On Dhiraj Sahu : साहू यांच्याकडील रोकड मोजण्यासाठी मागवली मशीन अन्…; राजकारणही तापलं

Subscribe

काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांचे घर आणि इतर ठिकाणी प्राप्तिकर विभागाने (IT) छापा टाकला होता. आतापर्यंतच्या कारवाईतील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे

रांची : काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांचे घर आणि इतर ठिकाणी प्राप्तिकर विभागाने चार दिवसांआधी छापा टाकून तब्बल 300 कोटी रुपयांहून अधिक रोकड जप्त केली. अद्यापही जप्त केलेली रोकड मोजण्याचे काम सुरू असल्याने रक्कमेचा आकडा वाढू शकतो. तेव्हा आज रविवारी (10 डिसेंबर) रोजी प्राप्तिकर विभागाने रोकड मोजण्यासाठी मशीन बोलावली असून, कर्मचाऱ्यांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. (IT Raid On Dhiraj Sahu Machine called for counting cash from Sahu and… Politics also heated up)

काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांचे घर आणि इतर ठिकाणी प्राप्तिकर विभागाने (IT) छापा टाकला होता. आतापर्यंतच्या कारवाईतील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. साहूंकडील असलेल्या एकूण रक्कमेपैकी 300 कोटींची रोकड जप्त करण्यात आली असून, पुढील काही दिवसांत या रक्कमेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कर्मचाऱ्यांसह मशीनमध्ये करण्यात आली वाढ

साहू यांच्याकडील रक्कम मोजण्याची काम आज पाचव्या दिवशीही सुरूच आहे. यापैकी अद्यापही काही रक्कम मोजणे बाकी असल्याने सुरुवातीला बँक कर्मचाऱ्यांसह 30 हून अधिक अधिकारी सहभागी झाले होते. पण, आता मोजणी त्वरीत पूर्ण करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने सुमारे 40 लहान-मोठ्या मशीन्स तसेच आणखी कर्मचारी मागवले आहेत. राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याशी संलग्न असलेल्या मद्य कंपनीकडून एवढी मोठी रोकड जप्त केल्याने काँग्रेसही त्यांच्यापासून दूर झाले आहे.

हेही वाचा : Sharad Pawar : ब्राझीलमधून अन्नधान्य आयात करायचे, हे ऐकून अस्वस्थ झालो; शरद पवारांनी सांगितली ‘ती’ आठवण

- Advertisement -

सणारा इमोजी शेअर करत भाजपकडून काँग्रेसची खिल्ली

पीएम मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. X वर हसणारा इमोजी शेअर करत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसची खिल्ली उडवली.

हेही वाचा : UP Murder Case : विचारलेल्या तीन प्रश्नांमध्ये झाली नाही पास, प्रियकराने प्रेयसी केली ‘खल्लास’

साहू यांच्या व्यवसायाशी आमचा संबंध नाही

काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीर साहू यांच्यावर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर भाजपविरुद्ध काँग्रेस यांच्यात सामना रंगला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सोशल मीडियावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. अशातच आता काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट करत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, खासदार धीरज साहू यांच्या व्यवसायाशी काँग्रेसचा काहीही संबंध नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -