घरताज्या घडामोडीFreshersसाठी नोकरीची संधी; टॉप चार IT कंपन्यांमध्ये निघणार भरती

Freshersसाठी नोकरीची संधी; टॉप चार IT कंपन्यांमध्ये निघणार भरती

Subscribe

देशातील चार टॉप आयटी कंपन्यांमध्ये एकूण भरत्या आर्थिक वर्षात २.१६ लाख होणार आहेत.

आयटी क्षेत्रात बम्पर भरती (IT Sector Hiring) निघण्याचे सत्र सुरू आहे. खासकरून आयटी क्षेत्रात फ्रेशर्ससाठी (Freshers Job) येणाऱ्या काळात नोकरीसाठी भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत. देशातील टॉप चार आयटी कंपन्यांची (IT Companies) भरती आर्थिक वर्षात २ लाखांहून निघणार आहेत. या भरती टीसीएस (TCS), इन्फोसिक (Inforsys), विप्रो (Wipro) आणि एचसीएल टेक (HCL Tech) या कंपन्या करणार आहेत.

नोकऱ्या सोडणाऱ्यांची संख्या वेगाने वाढल्यामुळे कंपन्या त्रस्त

आयटी कंपन्यांच्या डिसेंबर तिमाही परिणाममध्ये (Financial Result) हायरिंगच्या आकड्यांची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान आयटी कंपन्या नोकरी सोडणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे (Attrition Rate) त्रस्त आहेत. याशिवाय जवळपास सर्व क्षेत्र आता आयटी इंफ्रा मजबूत करण्यास लागले आहेत, ज्यामुळे आयटी कंपन्यांकडे पहिल्यापेक्षा जास्त ऑर्डर देत आहे. यामुळे आयटी कंपन्यांसमोर नोकरी सोडणाऱ्यांच्या जागा भरण्याची आणि वाढणाऱ्या ऑर्डरसाठी नव्या लोकांना भरती करण्याची दुहेरी जबाबदारी आहे.

- Advertisement -

TCSमध्ये येत्या ३ महिन्यात ३० हजार संधी

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ५५ हजार फ्रेशर्सना भरती करण्याचे लक्ष्य ठेवले होते, ते पूर्वीच हे लक्ष्य साध्य केले आहे आणि ७७ हजार भरती केली आहे. चालू आर्थिक वर्ष अंतिम तिमाहीमध्ये कंपनी आता ३० हजार आणखीन लोकांची भरती करणार आहे. याप्रमाणे या आर्थिक वर्षात टीसीएस एकूण १ लाख पेक्षा अधिक लोकांची भरती करणार आहे.

तसेच दुसऱ्या नंबरची आयटी कंपनी इन्फोसिसमध्येही नोकरी सोडून जाण्याची समस्या जास्त गंभीर आहे. इन्फोसिसमध्ये हा रेट २५.५ टक्के आहे. इन्फोसिसने या समस्येतून सुटका करण्यासाठी या आर्थिक वर्षात ५५ हजार भरती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याप्रमाणे विप्रोचे लक्ष्य १७ हजार फ्रेशर्सची भरती करण्याचे ठेवले आहे. एचसीएल टेक भरती मार्च २०२२मध्ये समाप्त होणार आहे, आर्थिक वर्षात ४४ हजारांवर ही संख्या पोहोचेल. याप्रमाणे चार टॉप आयटी कंपन्यांमध्ये एकूण भरत्या आर्थिक वर्षात २.१६ लाख होणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Indian Railway Recruitment 2022: दहावी पास झालेल्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख?


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -