घरCORONA UPDATECoronavirus: ब्रिटनमध्ये जनजीवन सुरळीत होण्यासाठी ६ महिन्यांहून अधिकचा कालावधी लागणार

Coronavirus: ब्रिटनमध्ये जनजीवन सुरळीत होण्यासाठी ६ महिन्यांहून अधिकचा कालावधी लागणार

Subscribe

ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी आपल्या देशातील ३ करोड कुटुंबांना पत्र लिहून त्यांना आपल्या घरीच राहण्याचे आवाहन केले आहे.

चीनच्या वुहान शहरात पसरलेल्या कोरोना विषाणूने ब्रिटनसह संपूर्ण जगात थैमान घातले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत १ हजार २२८ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १९ हजार ५२२ जण संसर्गित आहेत. ब्रिटनचे उप-मुख्य वैद्यकीय अधिकारी जेनी हॅरिस यांनी रविवारी सांगितले की कोरोना विषाणूंविरूद्धच्या लढाईनंतर ब्रिटनमधील जनजीवन सुरळीत होण्यासाठी ६ महिन्यांहून अधिकचा कालावधी लागणार आहे. वृत्तसंस्था एएफपीनुसार, जेनी हॅरिस म्हणाले की कोरोनाशी सामोरे जाण्यासाठी सध्याच्या लॉकडाउनचा दर तीन आठवड्यांनी आढावा घेतला जाईल. त्यांनी चेतावणी दिली की कोरोनाशी लढण्यासाठी घेतलेली पावले वेगाने बदलली गेली तर हा विषाणू पुन्हा एकदा वाढू शकतो.

एका दिवसात २५ हजार चाचण्या करता येणार

यापूर्वी इंग्लंडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) प्रोफेसर ख्रिस व्हिट्टी म्हणाले होते की ब्रिटन कोरोना व्हायरस चाचणीचा वेग वाढवित आहे. यूकेमध्ये पब्लिक हेल्थ इंग्लंड आणि नॅशनल हेल्थ सर्व्हिस (एनएचएस) दिवसाला २५ हजारांपर्यंत चाचणी घेऊ शकतात.

- Advertisement -

हेही वाचा – Lockdown: मालकाने काढलं बाहेर; पती गर्भवती पत्नीला घेऊन १०० किमी चालला

पंतप्रधान बोरिस जॉन्सनचे भावनिक आवाहन

ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन देखील कोरोनाचे शिकार झाले आहेत. यापूर्वी प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाल्याची माहितीही समोर आली होती. कोरोना विषाणूमुळे त्रस्त ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी आपल्या देशातील ३ करोड कुटुंबांना पत्र लिहून त्यांना आपल्या घरीच राहण्याचे आवाहन केले आहे, नाहीतर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -