घरताज्या घडामोडीकरोना व्हायरसचा भारतातला आकडा 'सहा' : जयपूरमध्ये इटलीच्या पर्यटकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह!

करोना व्हायरसचा भारतातला आकडा ‘सहा’ : जयपूरमध्ये इटलीच्या पर्यटकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह!

Subscribe

'ही वेळ घाबरण्याची नाही तर सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याची आहे. या साथीच्या आजाराला पळवून लावण्यासाठी आपण एकत्रित येणे गरजेचे आहे'. असे आवाहन मोदींनी ट्विटरवरून केले आहे.

करोना व्हायरसने सध्या अनेक देशात दहशत पसरवली आहे. भारतात करोना व्हायरच्या रूग्णांची संख्या आता वाढताने दिसते, कारण मंगळवारी जयपुरमध्ये एका इटालियन पर्यटकाच्या शरीरात करोना व्हायरसची लक्षणे आढळल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आरोग्य चाचणीत पर्यटकाला करोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर आता भारतात करोना व्हायरची लागण झालेल्या रूग्णांचा आकडा वाढून सहा वर गेला आहे.

मोदींचे ट्विटरवरून आवाहन

या प्रकरणी भारतीयांना अशा वेळी सतर्क राहण्यासाठी तसेच आरोग्याची काळजी घेण्याचे सांगितले आहे. यावेळी ट्विट करताना मोदी म्हणाले आहेत की, ‘ही वेळ घाबरण्याची नाही तर सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याची आहे. या साथीच्या आजाराला पळवून लावण्यासाठी आपण एकत्रित येणे गरजेचे आहे’. असे आवाहन मोदींनी ट्विटरवरून केले आहे. या प्रसंगी अरविंद केजरीवालांनी देखील केंद्रशासित प्रदेशाची तयारी तपासण्यासाठी आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक आयोजित केली होती.

- Advertisement -

 

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार ६७ देशात एकूण ९०,८५३ लोकांना करोनाची लागण झाली आहे तर यापैकी ३,१२२ जणांचा यात मृत्यू झाला आहे. तर करोनामुळे चीनमध्ये मृतांचा आकडा २,९४३ वर पोहचला आहे. यानुसार १२५ प्रकरणे नोंदवली आहेत. चीन देशातील आरोग्य विभागाच्या अधिकारांच्या अहवालानुसार व्हायरस पसरल्यानंतर हा सगळ्यात कमी आकडा असल्याचे त्यांनी मंगळवारी सांगितले आहे. तर अमेरिकेत एकूण सहा रूग्णांचा मृत्यू झाला असून ९० प्रकरणे निश्चित आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -