Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE इटली बनला यूरोपातील पहिला मास्क फ्री देश

इटली बनला यूरोपातील पहिला मास्क फ्री देश

२०२०मध्ये कोरोना महामारीची इतर देशांना फारशी झळ बसली नव्हती त्यावेळी एकट्या इटली या देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या सर्वाधिक होती.

Related Story

- Advertisement -

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीचा (Covid-19) सामना करत आहे. भारतासोबत जगभरातील अनेक देश कोरोना महामारीत भरडून गेले आहेत. जगभरात कोरोना महामारीची सर्वाधिक झळ बसलेल्या देशात ब्रिटनचा नंतर अमेरिका आणि भारताचा समावेश आहे.  मोठ्या देशांसोबत जगातील अनेक छोटे छोटे देश कोरोना महामारीत मोठ्या संकटात आले. त्यातील एक देश म्हणजे इटली. कोरोना महामारीत इटली देशाला देखील कोरोनाची सर्वाधिक झळ बसली. कोरोनामुळे इटलीतील लोकांची दयनीय अवस्था झाली होती. मात्र हाच देश आता कोरोनामुक्त होण्याच्या दिशेन सकारात्मक पाऊले उचलत आहे. इटलीत आता घरातून बाहेर पडताना मास्क लावण्याची गरज नसल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे इटली हा देश यूरोपातील पहिला मास्क फ्री देश झाला आहे. (Italy became the first mask free country in Europe)  इटलीच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार इटलीतील २० राज्यांचा लो कोरोना रिस्क गटात समावेश करण्यात आलाय. या जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या फार कमी असल्याचे सांगण्यात आले.

२०२०मध्ये कोरोना महामारीची इतर देशांना फारशी झळ बसली नव्हती त्यावेळी एकट्या इटली या देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या सर्वाधिक होती. इटली या देशासाठी हा सर्वाधिक कठिण काळ ठरला होता. परंतु या काळातही इटलीत लोक संपूर्ण देशाला कोरोना महामारीशी न घाबरताना सामना करण्याचे आवाहन करत होते.

- Advertisement -

जगभरात अनेक राज्यात आता कोरोनाचा कहर कमी होत आहे. जगभरात सध्या ३ लाख ९ हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. भारतातही कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होताना दिसत आहे. भारत आरोग्य मंत्रालयाने दिलेल्य माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात ३७ हजार ५६६ नवे रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात सध्या ५ लाख ५२ हजारांहून अधिक अँक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना महामारीत सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या ब्रिटनमध्ये आता कोरोनाची तिसरी लाट सुरु आहे. ब्रिटनमध्ये दिवसाला १४ हजारांहून अधिक नव्या बाधित रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. तर शनिवारी ब्रिटेनध्ये १४० दिवसांनी तब्बल १८ हजारांहून अधिक बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली.

भारतात कोरोना रुग्णांची कमी होत असली तरी कोरोनाच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे भारताचा धोका आणखी वाढला आहे. देशभरात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आता पर्यंत ४० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना महामारीशी लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. अमेरिकेला मागे टाकत भारतात सर्वाधिक लसीकरण करणारा देश बनला आहे.


- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus India Update: देशातील नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट, तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५६ हजार पार

 

- Advertisement -