घरCORONA UPDATELockDown: भारत नाही पण 'हा' देश झाला लॉकडाऊन मुक्त

LockDown: भारत नाही पण ‘हा’ देश झाला लॉकडाऊन मुक्त

Subscribe

भारतातील लॉकडाऊन आज तिसऱ्यांदा वाढवण्यात आले असून आता १७ मेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. मात्र जगात आज एका देशाला लॉकडाऊनमधून मुक्ती मिळाली आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या इटलीमध्ये लॉकडाऊनमधून सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. येथील पंतप्रधान ग्युसेप कोंते यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ आठवड्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनला देशातील काही भागांमधून हटवले आहे.

हेही वाचा – शाओमीचा Mi Note 10 Lite लाँच; जाणून घ्या फिचर्स

- Advertisement -

तब्बल ८ आठवडे होता लॉकडाऊन

पंतप्रधान यांची जनतेला संबोधित करताना सांगितले की, ४ मे पासून इटलीतील लोकं आपल्या कॉनज्युनिटीसह झोनमध्ये फिरू शकतात. कॉनज्युनिटी हा इटालियन शब्द असून त्याचा अर्थ नातलग, कुटुंब असा होतो. लॉकडाऊनच्या काळात इटलीतील लोकांना केवळ जीवनावश्यक वस्तूंसाठीच घराबाहेर पडण्याची मुभा होती. अशावेळी घरात बसून चीड आलेल्या लोकांनी प्रतिप्रश्न केला. कोणते नातलतं. कोणतं कुटुंब. दरम्यान, शब्दकोशात कॉनज्युनिटीचा अर्थ शोधणाऱ्यांची मोठी संख्या तिथे पाहायला मिळाली.

भारतात तिसऱ्यांदा वाढवला लॉकडाऊन

भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आज केंद्र सरकारने पुन्हा दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवला आहे. यापूर्वी २४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा पाहून पंतप्रधानांनी पुन्हा १४ एप्रिलला ३ मेपर्यंत लॉकडाऊन राहणार असल्याचे जाहीर केले. देशात सर्व पातळीवर कोरोनाशी लढा देण्यासाठी आरोग्य यंत्रणा काम करत असूनही कोरोना रुग्णांची संख्या काही गेल्या कमी होताना दिसत नाही. त्याच पार्श्वभूमीवर आज १७ मेपर्यंतच्या लॉकडाऊनची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -